Sathankulam Custodial Death Case Verdict: ९ पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांना मृत्युदंडाची शिक्षा, हायकोर्टाचा फैसला; काय आहे प्रकरण?

Sathankulam Custodial Death Case Verdict: तामिळनाडूच्या साथानकुलम पोलीस छळ प्रकरणात मदुराई न्यायालयाने ९ पोलिसांना फाशीची शिक्षा सुनावली आहे.
Sathankulam Custodial Death Case Verdict: ९ पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांना मृत्युदंडाची शिक्षा, हायकोर्टाचा फैसला; काय आहे प्रकरण?
Published On
Summary
  • साथानकुलम कोठडीतील मृत्यू प्रकरणात ऐतिहासिक निकाल

  • ९ पोलिसांना न्यायालयाकडून मृत्युदंडाची शिक्षा

  • ६ वर्षांच्या सुनावणीनंतर कठोर निर्णय

तामिळनाडूतील साथानकुलम कस्टोडियल डेथ प्रकरणात आज उच्च न्यायालय मदुराईच्या खंडपीठाने ऐतिहासिक निकाल दिला. न्यायालयाने या प्रकरणात दोषी आढळलेल्या सर्व ९ पोलिसांना मृत्युदंडाची शिक्षा सुनावली. या निकालामुळे हे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. नेमकं हे प्रकरण काय हे जाणून घेऊ.

२०२० सालच्या प्रसिद्ध सांथंकुलम कोठडीतील हत्या प्रकरणात न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय दिला आहे. मद्रास उच्च न्यायालयाच्या मदुराई खंडपीठाने या प्रकरणात दोषी आढळलेल्या तामिळनाडूच्या नऊ पोलिसांना मृत्युदंडाची शिक्षा सुनावली आहे. ही घटना 'अत्यंत घृणास्पद' मानल्यामुळे न्यायालयाने ही कठोर शिक्षा ठोठावली आहे.

सहा वर्ष चाललेल्या खटल्यानंतर हा निकाल देण्यात आला आहे. या प्रकरणाची सुनावणी प्रथम अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश जी. मुथुकुमारन यांच्या न्यायालयात झाली. त्यांनी सर्व नऊ आरोपींना खून आणि इतर संबंधित आरोपांखाली दोषी ठरवले.

प्रकरण काय?

हे प्रकरण तुतीकोरीन जिल्ह्यातील साथनकुलम येथील आहे येथील दुकानदार पी. जयराज आणि त्यांचा मुलगा जे. बेनिक्स यांचा पोलीस कोठडीत मृत्यू झाला होता. २०२० मध्ये कोरोना लॉकडाऊन दुकानासाठी वेळ निर्धारित करण्यात आले होते. त्यावेळी तूतीकोरिन जिल्ह्यातील साथानकुलम येथे पी. जयराज ( वय ५८) आणि त्यांचा मुलगा बेनिक्स (३१) यांनी आपले मोबाईलचे दुकान निर्धारित वेळेपेक्षा जास्त काळ उघडे ठेवले होते.

या शुल्लक कारणावरून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. कोठडीत या पिता-पुत्रावर रात्रभर अमानुष लाठीने मारहाण करण्यात आली होती. अहवालानुसार, दोघांनाही जबर मार लागल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला होता. त्यात त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे देशभरात संतापाची लाट उसळली होती. लोकांनी पोलीस कोठडीतील हिंसेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. नागरिकांनी पीडितांना न्याय मिळवा मागणी केली. दरम्यान त्यानंतर या प्रकरणाचा तपास केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (CBI) सोपवण्यात आला.

सीबीआयला आपल्या तपासात असे आढळून आले की, हा अत्याचार पूर्वनियोजित होता. तपास यंत्रणेने न्यायालयात असा युक्तिवाद केला की, आरोपीने हा गुन्हा हेतुपुरस्सर केला होता. त्यामुळे आरोपींना कठोर शिक्षा मिळायला हवी. न्यायालयाने सीबीआयचा हा युक्तिवाद स्वीकारला आणि ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली. या प्रकरणात दोषी ठरलेल्या नऊ पोलिसांमध्ये इन्स्पेक्टर एस. श्रीधर, सब-इन्स्पेक्टर पी. रघु गणेश आणि के. बालकृष्णन, हेड कॉन्स्टेबल एस. मुरुगन आणि ए. समादुराई, आणि कॉन्स्टेबल एम. मुथुराज, एस. चेल्लादुराई, एक्स. थॉमस फ्रान्सिस आणि एस. वेलुमुथू यांचा समावेश आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com