Election Result : आजीच्या पराभवाचा घेतला बदला; काँग्रेस नेत्याच्या सुनेला २१ वर्षांच्या नातीने हरवले

Sarpanch Election: राजस्थानच्या दौसा जिल्ह्यातील २१ वर्षीय खुशी खंडेलवालने सरपंचपदाच्या निवडणुकीत काँग्रेस नेत्याच्या सुनेचा पराभव केला. आईचे नामांकन रद्द झाल्यानंतर निवडणुकीत उतरलेल्या खुशीने २१ वर्षांपूर्वी आजीचा झालेला पराभवही उलटवला.
Khushi Khandelwal, Rajasthan Sarpanch Election
Khushi Khandelwal, Rajasthan Sarpanch Election
Published On: 

Khushi Khandelwal, Rajasthan Sarpanch Election : २१ वर्षाच्या तरूणीने सरपंचपदाच्या निवडणुकीत काँग्रेस नेत्याच्या सुनेचा पराभव केला. आईचे नामांकन रद्द झाल्यामुळे ती ऐनवेळी निवडणुकीच्या रिंगणात उतरली होती. तिने फक्त निवडणूकच जिंकली नाही, तर २१ वर्षापूर्वी झालेल्या आजीच्या पराभवाचा वचपाही काढला. राजस्थानमधील दौसा जिल्ह्यातील या निवडणुकीची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.

शिवसिंहपुरा पंचायत समिति अंतर्गत येणाऱ्या लाखनपुर ग्रामपंचायतीमध्ये ग्रामस्थांनी बाबूलाल खंडेलवाल यांच्या पत्नी इंद्रा खंडेलवाल यांना सरपंचपदासाठी उमेदवार बनवण्याचा निर्णय घेतला होता. पण नामांकनादरम्यान त्यांचे नाव लालसोट नगर परिषदच्या मतदाता सूचीतही असल्याचे समोर आल्यामुळे त्यांचे नामांकन रद्द होण्याची दाट शक्यता होती.

आईचे नामांकन रद्द होण्याची शक्यता असल्याने २१ वर्षीय मुलगी खुशी खंडेलवाल हिने निवडणुकीच्या मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला. आई आणि मुली दोघांनीही अर्ज दाखल केला होता, परंतु छाननीदरम्यान आईचे नामांकन रद्द झाले. एमएससी (झोलॉजी) पर्यंत शिक्षण घेतलेली खुशी हिचे नामांकन वैध ठरले.

Khushi Khandelwal, Rajasthan Sarpanch Election
मोठी बातमी! दहावी-बारावी बोर्डाच्या परीक्षांच्या तारखा जाहीर; कधीपासून सुरू होणार परीक्षा? पाहा वेळापत्रक

खुशी खंडेलवाल हिने निवडणुकीच्या रिंगणात उतरून फक्त आपल्या कुटुंबाची राजकीय प्रतिष्ठाच वाचवली नाही, तर वरिष्ठ कांग्रेस नेते ईश्वरलाल मीना यांच्या पुत्रवधूसोबत झालेल्या चुरशीच्या लढतीत दणदणीत विजय मिळवला. या विजयामुळे खुशी ही दौसा जिल्ह्यातील सर्वात कमी वयाची सरपंच ठरल्याची जोरदार चर्चा आहे. विजयानंतर बोलताना खुशीने सांगितले की, ग्रामपंचायतीच्या समस्या सोडवणे, विकासडकामांना गती देणे आणि सरकारी योजनांचा लाभ प्रत्येक गरजूंपर्यंत पोहोचवणे हीच आपली मुख्य प्राथमिकता असेल.

Khushi Khandelwal, Rajasthan Sarpanch Election
शेतकऱ्यांची दिवाळी गोड! आता प्रत्येक शेतकऱ्याला मिळणार 'फार्मर आयडी', फडणवीस सरकारकडून SOP जाहीर, कुणाला मिळणार लाभ?

खुशीच्या या विजयाने तिच्या कुटुंबाचा तब्बल २१ वर्षे जुना राजकीय इतिहास पुन्हा ताजा केला आहे. २००५ मध्ये खुशीच्या आजी कमला गुप्ता यांनी चौंडियावास ग्रामपंचायतीमधून सरपंचपदाची निवडणूक लढवली होती. मात्र, त्या निवडणुकीत त्यांना याच ईश्वरलाल मीना यांच्या पत्नीकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. आता बरोबर २१ वर्षांनंतर त्यांच्या नातीने त्याच राजकीय कुटुंबाच्या सुनेला पराभूत करून जुन्या पराभवाचा बदला घेतला आहे. पोटची नात सरपंच झाल्याचे समजताच आजीला आनंद अनावर झाला आणि त्यांच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू तरळले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.