Sanjay Raut : आमदार खरेदीसाठी किती कोटी वापरले? राज्य सरकारच्या जाहिराती निधीवरून संजय राऊतांची टीका

Sanjay Raut News: राज्य सरकारच्या जाहिरातीच्या खर्चावरून संजय राऊतांनी टीका केली आहे. आमदार खरेदीसाठी किती कोटी वापरले? असा सवाल करत संजय राऊत यांनी टीका केली आहे.
आमदार खरेदीसाठी किती कोटी वापरले? राज्य सरकारच्या जाहिरातीच्या खर्चावरून संजय राऊतांची टीका
Sanjay Raut Eknath Shinde NewsSaam TV
Published On

मुंबई : सरकारी योजनांच्या प्रसिद्धीच्या जाहिरातींवर राज्य सरकार २७० कोटी ५ लाख रुपये खर्च करणार आहे. या खर्चासाठी सोमवारी शासन निर्णय देखील राज्य सरकारने काढला. योजनांच्या जाहिराती निधीवरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली आहे. आमदार खरेदीसाठी किती कोटी वापरले? असं सवाल करत संजय राऊत यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे.

राज्य सरकारच्या जाहिरात निधीवरून संजय राऊत यांनी टीका केली आहे. '२७० कोटी हा एकदम कमी निधी आहे. आमदार खरेदीसाठी यांनी किती कोटी वापरले हे बघा. स्वतःच्या प्रसिद्धीसाठी हे करुद्या, अशी टीका राऊत यांनी केली.

आमदार खरेदीसाठी किती कोटी वापरले? राज्य सरकारच्या जाहिरातीच्या खर्चावरून संजय राऊतांची टीका
Maharashtra Politics : माझी हत्या झाली तरी चालेल, पण एकनाथ शिंदेंना सोडणार नाही; शिवसेना आमदाराची खळबळजनक पोस्ट

अजित पवारांच्या वेशांतरावर भाष्य करताना संजय राऊत यांनी मोदी सरकारला लक्ष्य केलं. 'मुंबई-दिल्ली सारख्या विमानतळावर देशाचे गृहमंत्री आणि राज्याचे गृहमंत्री यांनी खेळ चालवला आहे. यातून देशात घातपाताला चालना मिळू शकते. अजित पवार आले आणि त्यांच्या नाट्यकलेची माहिती त्यांनी दिली. १०-१२ वेळा वेशांतर केल्याचं त्यांनी सांगितलं. ते बनावट नावाने आले होते. त्यांचे बोर्डिंग पास जप्त करायला हवेत. तसेच बऱ्याच गोष्टी केल्याचं त्यांनी सांगितल. या महाराष्ट्राला कलाकारांची मोठी परंपरा आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केली.

आमदार खरेदीसाठी किती कोटी वापरले? राज्य सरकारच्या जाहिरातीच्या खर्चावरून संजय राऊतांची टीका
IAS Pooja Khedkar: जमिनीसाठी धोंडीबाचा 'कोंडीबा' झाला, पूजा खेडकरच्या वडिलांचा नवा कारनामा

'विमानतळाची सुरक्षा किती खोटी आहे हे यातून दिसून येत आहे. वेशांतर करून एक व्यक्ती देशाच्या गृहमंत्र्यांना भेटतो, हा देशाच्या सुरक्षेसोबत खेळ आहे. दाऊद, टायगर मेमन यांना ही संधी मिळाली होती का? याच उत्तर द्यावं. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस वेशांतर करून यायचे, असं त्यांनी सांगितलं. त्यांनी बनावट ओळखपत्र बनवले होते. या सर्वांची दाखल घेऊन चौकशी होण्याची गरज आहे. अजित पवार आणि इतर लोकांवर गुन्हे दाखल करावेत. आमच्यासाठी हा गंभीर मुद्दा आहे, असे संजय राऊत पुढे म्हणाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com