Maharashtra Politics : माझी हत्या झाली तरी चालेल, पण एकनाथ शिंदेंना सोडणार नाही; शिवसेना आमदाराची खळबळजनक पोस्ट

Mla Balaji Kinikar News : माझी हत्या झाली तरी चालेल, पण मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची साथ सोडणार नाही, अशी खळबळजनक पोस्ट शिवसेना शिंदे गटाचे आमदार बालाजी किणीकर यांनी केली आहे.
माझी हत्या झाली तरी चालेल, पण एकनाथ शिंदेंना सोडणार नाही; शिवसेना आमदाराची खळबळजनक पोस्ट
Eknath shinde Balaji KinikarSaam TV
Published On

माझी हत्या झाली तरी चालेल, पण मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची साथ सोडणार नाही, अशी खळबळजनक पोस्ट शिवसेना शिंदे गटाचे आमदार बालाजी किणीकर यांनी केली आहे. अंबरनाथ शहराचा विकास मी थांबू देणार नाही, असंही किणीकर यांनी आपल्या पोस्टमधून म्हटलंय. त्यांच्या या पोस्टमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

माझी हत्या झाली तरी चालेल, पण एकनाथ शिंदेंना सोडणार नाही; शिवसेना आमदाराची खळबळजनक पोस्ट
Maharashtra Politics : विधानसभेपूर्वी शिंदे गटाला मोठा धक्का, अजित पवारांनी गेम केला; शिवसेनेचा विश्वासू नेताच फोडला

दरम्यान, आमदार बालाजी किणीकर (Mla Balaji Kinikar) यांचा रोख नेमका कुणाकडे? याची चर्चा सुरू झाली आहे. आपल्या सोशल मीडियावर अकाउंटवरून केलेल्या पोस्टमध्ये आमदार किणीकर म्हणतात, काही समाजकंटक पक्षाच्या आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात काम करत आहेत.

"तसंच ते अंबरनाथमध्ये होत असलेल्या विकासकामांच्या देखील विरोधात आहे. पण, माझी हत्या झाली तरी चालेल, मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांची साथ सोडणार नाही. शहराचा विकास मी कधीच थांबू देणार नाही", असं आमदार किणीकर म्हणाले आहेत.

कोण आहेत आमदार बालाजी किणीकर?

आमदार बालाजी किणीकर हे ठाण्यातील अंबरनाथचे आमदार आहेत. २०१९ मध्ये त्यांनी काँग्रेसच्या रोहित साळवे यांचा पराभव करत सलग तिसऱ्यांदा विधानसभेत एन्ट्री घेतली. यापूर्वी आमदार किणीकर हे २००९ आणि २०१९ साली निवडून आले होते. शिवसेना फुटींतर किणीकर यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला. तेव्हापासून ते शिंदे गटातच आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com