नवी दिल्ली : 'मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मौलवीच्या वेशात दिल्ली जायचे. तसेच नाव बदलून अमित शहांना भेटायचे, असा खळबळजनक दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. तसेच अजित पवार यांच्या वेशांतरावरही संजय राऊत यांनी भाष्य केलं. संजय राऊत यांच्या खळबळजनक दाव्यानंतर एकच खळबळ उडाली आहे.
संजय राऊत दिल्ली दौऱ्यावर आहेत. संजय राऊत यांनी वेशांतर करून दिल्लीला जाण्यावरून सत्ताधाऱ्यांवर टीका केली. संजय राऊत यांनी म्हटलं की, 'मुंबई-दिल्ली सारख्या विमानतळावर देशाचे गृहमंत्री आणि राज्याच गृहमंत्र्यांनी खेळ चालवला आहे. यामुळे घातपाताला चालना मिळू शकते. अजित पवारांनी नाट्यकलेंची माहिती दिली. त्यांनी १०-१२ वेळा वेशांतर करून दिल्लील गेल्याचं सांगितलं. त्यामुळे त्यांचे बनावट नावाचे बोर्डिंग पास जप्त करावेत'.
'विमानतळाची सुरक्षा किती खोटी आहे हे यातून दिसून येते. वेशांतर करून एखादा व्यक्ती केंद्रीय गृहमंत्र्यांना भेटतो. हा देशाच्या सुरक्षेचा खेळ आहे. दहशतवाद्यांनाही ही संधी मिळाली होती का? याचं उत्तर त्यांनी द्यावं. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस वेशांतर करून यायचे, असं त्यांनी सांगितलं. एकनाथ शिंदे मौलवीच्या वेशात गेल्याची माझ्याकडे माहिती आहे. त्यांनी मौलवीच्या नावाने आल्याची माझी माहिती आहे. त्यांनी बनावट ओळखपत्र बनवले होते. याची चौकशी होण्याची गरज आहे, असा खळबळजनक आरोप संजय राऊत यांनी केला.
'अजित पवार आणि इतर लोकांवर गुन्हे दाखल केले पाहिजे. महाराष्ट्रातून वेशांतर करून दिल्लीत जायचे त्यांनीच खुलासा केला आहे. त्यांच्याकडून त्या पदाचा अपमान आहे. तुम्ही महाराष्ट्रासोबत बेईमानी करत होता. अमित शाह यांच्यसोबत काय बोलत होते? नाव बदलून तुम्ही का जात होते? उद्या एखादा दहशतवादी नाव बदलून येईल. दिल्ली आणि मुंबई विमानतळ, एअरलाईन्स यांची चौकशी झाली पाहिजे. सिव्हील अॅक्टिवेशन मंत्र्यांनी याचं उत्तर द्यावं. उद्या एखादा दहशतवादी भेटायला येईल, असेही संजय राऊत म्हणाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.