VIDEO: वेषांतर, मौलवी आणि बनावट कागदपत्र, Sanjay Raut यांनी सगळंच काढलं
अजित पवार यांनी दिल्लीत पत्रकारांशी संवाद साधताना महायुतीत सामील होण्यापुर्वी केलेल्या वेषांतर, दौरे आणि गृहमंत्र्यांसोबतच्या बैठका यांबद्दल सांगितलं. महायुतीत सामील होण्यापुर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत केलेल्या गुप्त बैठकांवेळी केलेलं विशेष वेषांतर याबद्दल देखील अजित पवार यांनी सांगितलं. यावर आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सडकून टीका केली आहे. मुंबई दिल्ली सारख्या विमानतळावर देशाचे गृहमंत्री आणि राज्याचे गृहमंत्री यांनी खेळ चालवला आहे असं संजय राऊत म्हणालेयातून देशात घातपाताला चालना मिळू शकते. अजित पवार यांनी महायुतीत सामील होण्या आधीच्या नाटकाची माहिती दिली. ते त्यात 10-12 वेळा वेश पालटून, बनावट नावाने आल्याचं आणि बऱ्याच गोष्टी केल्याचं त्यांनी सांगितल. यातून विमानतळाची सुरक्षा किती खोकळी आहे हे यातून दिसून येत असल्याचं ते म्हणाले. वेश पालटून येऊन एक व्यक्ती देशाच्या गृहमंत्री यांना भेटतो हा देशाच्या सिक्युरिटी सोबतचा खेळ असल्याच म्हणत संजय राऊत यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. दरम्यान एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस वेश पालटून यायचे, एकनाथ शिंदे मौलवीच्या वेशात गेल्याची माहिती असल्याचा संजय राऊत यांनी गंभीर आरोप केला आहे. त्यांनी बनावट ओळखपत्र बनवले होते. त्यामुळे या सगळ्याची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.