
नवी दिल्ली : आरबीआयचे नवे गव्हर्नर संजय मल्होत्रा होणार आहेत. मल्होत्रा पुढील ३ वर्षांसाठी गव्हर्नर म्हणून भूमिका पार पाडतील. ते आरबीआयचे विद्यमान गव्हर्नर शक्तिकांत दास यांची जागा घेणार आहेत. १० डिसेंबर रोजी गव्हर्नर शक्तिकांत दास यांचा कार्यकाळ संपणार आहे. २०२२ साली डिपार्टमेंट ऑफ फायनान्शिअल सर्व्हिसेजचे (महसूल) सचिव संजय मल्होत्रा यांची रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
संजय मल्होत्रा हे १९९० बॅचचे राजस्थान कॅडरचे आयएएस अधिकारी आहेत. नोव्हेंबर २०२० साली आरईसीचे चेअरमन आणि एमडी झाले. याआधी ऊर्जा मंत्रालयाचे अॅडिशनल सेक्रेटरीपदावरही काम केलं आहे. संजय मल्होत्रा यांनी इंजिनिअरिंगची डिग्री आयआयटी कानपूरहून मिळवली आहे. त्यांनी प्रिंसटन विद्यापीठातून पदव्यूत्तर शिक्षण पूर्ण केलं. मागील ३० वर्षांत मल्होत्रा यांनी वीज विभाग, अर्थ, आयकर, आयटी, खाण यांसारख्या विभागात काम केलं आहे.
शक्तिकांत दास हे मागील ६ वर्षांपासून आरबीआयच्या गव्हर्नर पदावर काम करत आहेत. उर्जित पटेल यांनी अचानक राजीनामा दिल्यानंतर शक्तिकांत दास यांनी कमान सांभाळली होती. त्यांनी कोराना काळानंतर देशातील महगाई नियंत्रिण करण्यासाठी मोलाची भूमिका निभावली. मात्र, त्यांचा कार्यकाळ न वाढवण्याबाबत कोणतीच चर्चा सुरु नाहीये.
त्यांच्या कामाचा अनुभव पाहता सरकारने त्यांची गव्हर्नरपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सरकारकडून रिझर्व्ह बँकेच्या बोर्डाच्या सदस्यांची नियुक्ती केली जाते. या पदाची नियुक्ती ४ वर्षांसाठी असते. रिझर्व्ह बँकेच्या संचालक मंडळात दोन भाग असतात. ऑफिशियल डायरेक्टरमध्ये पूर्णवेळ गव्हर्नर आणि किमान ४ डिप्टी डायरेक्टर असतात. नॉन ऑफिशियल डायरेक्टरमध्ये २ सरकारी अधिकारीसहित १० डायरेक्टरची नियुक्ती केली जाते. इतर ४ डायरेक्टर हे ४ विभागीय मंडळातून सामील केले जातात.
अर्थतज्त्र डॉ. नरेश बोडखे म्हणाले, 'संजय मल्होत्रा यांची RBI गव्हर्नर म्हणून नियुक्ती झाली आहे. देशात महागाई वाढत आहे, ती कमी करण्यासाठी मोठं आव्हान मल्होत्रा यांच्यासमोर असणार आहे. जीडीपीची वाढ कमी झाली आहे. रोजगार निर्मिती करण्याच मोठं आव्हान असणार आहे. मल्होत्रा हे निर्णय प्रक्रियेत कितपत सहभागी होतात हे बघावं लागणार आहे. मल्होत्रा हे अर्थतज्ज्ञ नाहीत. ते महसूल सचिव होते. त्यामुळं त्यांच्यापुढे मोठी आव्हान असणार आहेत'.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.