'बचपन का प्यार' फेम सहदेवला मिळाली नवी कोरी कार!

त्याच्या बचपन का प्यार गण्यामुळे त्याला आता चक्क नवी कोरी कार मिळाली आहे.
'बचपन का प्यार' फेम सहदेवला मिळाली नवी कोरी कार!
'बचपन का प्यार' फेम सहदेवला मिळाली नवी कोरी कार!Saam Tv
Published On

मुंबई : सध्या सोशल मिडियावर 'बचपन का प्यार' फेम एक मुलगा तुफान व्हायरल होत आहे. हे 'बचपन का प्यार' गाणं त्याने गायलं होते. या गाण्याने सर्वांनाच वेड लावून सोडले आहे. तो सोशल मीडिया social Media वर प्रचंड व्हायरल झाला. त्याची लोकप्रियता इतकी वाढली की त्याने मागील आठवड्यात 'इंडियन आयडॉल' Indian Idol सारख्या मोठ्या शो मध्ये देखील बोलवण्यात आले होते. या लोकप्रिय मुलाचे नाव सहादेव कुमार दिर्डो Sahadev Kumar Dirdo आहे. त्याच्या बचपन का प्यार मुळे त्याला आता चक्क नवी कोरी कार मिळाली आहे.

त्याला ही नवी कोरी कार नक्की कोणी दिली याविषयी अद्याप माहिती समोर आलेली नाही. पण सहदेवला कारची चावी देताना एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे या नव्या कोऱ्या कारची किंमत तब्बल 23 लाख रुपये आहे. सहदेव गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे.

मोठमोठे व्यक्ती त्याचे चाहते;

सुरुवातीला त्याचा बचपन का प्यार व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर छत्तीसगढचे मुख्यमंत्री भूपेश बघेल Bhupesh Baghel यांनी सहदेवकडून त्याचे ते गाणे गाऊन घेत त्याचा सत्कार केला होता. तर त्यानंतर अनेक सेलिब्रिटींनी सहदेवच्या त्या व्हायरल झालेल्या गाण्यावर अनेक रील्स, व्हिडिओज बनवले होते. त्यामुळे त्याच्या मजेशीर गाण्याने मोठे चाहते निर्माण झाले होते.

भारतीय रॅपर बादशाहने Badshah याने देखील सहदेवला ऑफर दिली होती. आणि एक गाणे बनवले आहे. त्याचा टीझर देखील प्रदर्शित करण्यात आला आहे. त्याने चंदिगढ मध्ये सहदेवला भेटण्यासाठी बोलवले होते. प्रसिद्ध रिॲलिटी शो इंडियन आयडॉल मधून देखील सहदेवला निमंत्रण आले होते. त्यामुळे आता सहदेव गाण्यात आपले करिअर करणार का हे पाहावं लागेल...

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com