Sabarmati Express : साबरमती एक्स्प्रेस रुळावरून घसरल्याने रेल्वे वाहतूक ठप्प; अनेक गाड्या रद्द, काहींचे मार्ग बदलले

Sabarmati Express Accident : साबरमती रेल्वे अपघातानंतर अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या असून काहींचे मार्ग वळवण्यात आले आहेत. त्यामुळे प्रवाशांची मोठी तारांबळ उडाली आहे.
साबरमती एक्स्प्रेस रुळावरून घसरल्याने रेल्वे वाहतूक ठप्प; अनेक गाड्या रद्द, काहींचे मार्ग बदलले
Sabarmati Express AccidentSaam TV
Published On

उत्तर प्रदेशातील कानपूर शहरानजीक शनिवारी पहाटेच्या सुमारास रेल्वेचा भीषण अपघात झाला. वाराणसीहून गुजरातची राजधानी अहमदाबादकडे जाणाऱ्या साबरमती एक्स्प्रेसचे तब्बल 22 डबे रुळावरून खाली घसरले. सुदैवाने या घटनेत कुणालाही दुखापत झाली नाही. मात्र, अपघातामुळे रेल्वेरुळ उखाडला गेला असून वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे.

साबरमती एक्स्प्रेस रुळावरून घसरल्याने रेल्वे वाहतूक ठप्प; अनेक गाड्या रद्द, काहींचे मार्ग बदलले
Rain Alert : देशातील 11 राज्यांमध्ये आज वादळी वाऱ्यांसह मुसळधार पाऊस; महाराष्ट्रातील या जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट

साबरमती रेल्वे अपघातानंतर अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या असून काहींचे मार्ग वळवण्यात आले आहेत. त्यामुळे प्रवाशांची मोठी तारांबळ उडाली आहे. रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, विरांगना लक्ष्मीबाई झाशी-लखनौ चारबाग पॅसेंजर (दोन्ही मार्गाने) क्रमांक ०१८२३/०१८२४ रद्द करण्यात आली आहे.

कोणकोणत्या रेल्वेगाड्या रद्द?

विरांगना लक्ष्मीबाई झाशी-लखनौ इंटरसिटी एक्सप्रेस देखील अचानक रद्द करण्यात आली आहे. कानपूर सेंट्रल-माणिकपूर मेमू (दोन्ही मार्ग) थांबण्यात आली आहे. त्याचबरोबर कानपूर सेंट्रल-व्ही. झाशी मेमूची वाहतूक देखील रद्द करण्यात आली आहे. ग्वाल्हेर-इटावा मेमू आणि ग्वाल्हेर-भिंड मेमू या गाड्या देखील रद्द करण्यात आल्या आहेत.

या रेल्वेगाड्यांचे मार्ग बदलले

अपघातानंतर, लखनौ जंक्शन-व्ही झांसी, गोविंदपुरी-इटावा-भिंड-ग्वाल्हेर-व्ही झांसी, गोरखपूर-लोकमान्य टिळक टर्मिनल गोविंदपुरी-इटावा-भिंड-ग्वाल्हेर-व्ही झाशी आणि गोरखपूर-लोकमान्य टिळक टर्मिनल कानपूर-इटावा-भिंड-ग्वाल्हेर-व्ही झाशी रेल्वेगाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत.

साबरमती एक्स्प्रेसचा अपघात कशामुळे झाला?

ट्रेनच्या ड्रायव्हरने सांगितले की, ट्रेन कानपूरच्या पुढे आली तेव्हा भलामोठा दगड इंजिनला आदळल्याचा आवाज आला. त्यामुळे इंजिनचा पुढचा भाग खराब झाला आणि ट्रेनचे 22 डबे रुळावरून घसरले. सुदैवाने या अपघातात प्रवाशांना किंवा कर्मचाऱ्यांना कोणतीही दुखापत झाली नाही. अपघातानंतर बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. रेल्वेने आपत्कालीन क्रमांकही जारी केला आहे.

साबरमती एक्स्प्रेस रुळावरून घसरल्याने रेल्वे वाहतूक ठप्प; अनेक गाड्या रद्द, काहींचे मार्ग बदलले
Monkeypox Virus : कोविडनंतर मंकीपॉक्सचं संकट, आफ्रिकेसह 13 देशांमध्ये मंकीपॉक्सचा धुमाकूळ

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com