Monkeypox Virus
Monkeypox VirusSaam Digital

Monkeypox Virus : कोविडनंतर मंकीपॉक्सचं संकट, आफ्रिकेसह 13 देशांमध्ये मंकीपॉक्सचा धुमाकूळ

Monkeypox Virus News : कोरोना महामारीचे धोके अजून संपत नाही तोवर, ‘मंकी पॉक्स’ हा संसर्गजन्य आजार जगभर वेगाने पसरू लागला आहे. आतापर्यंत 13 देशांमध्ये मंकीपॉक्सचे रुग्ण आढळले आहेत.
Published on

कोरोना महामारीचे धोके अजून संपत नाही तोवर, ‘मंकी पॉक्स’ हा संसर्गजन्य आजार जगभर वेगाने पसरू लागला आहे. आतापर्यंत 13 देशांमध्ये मंकीपॉक्सचे रुग्ण आढळले आहेत. द. आफ्रिकेमध्ये तर 500 च्यावर रुग्णांचा मृत्यू झालाय. जागतिक आरोग्य संघटनेने आणीबाणी जाहीर केली आहे. पाहूया एक रिपोर्ट..

कोरोनाच्या संकटानंतर जग सावरलं असतानाच आता मंकीपॉक्सनं अनेक देशांची झोप उडवली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने मंकीपॉक्स ही जागतिक सार्वजनिक आरोग्य आणीबाणी घोषित केली आहे. याआधी आफ्रिकेत त्याचा प्रसार झाला होता आणि आता युरोपातील काही देशांमध्येही केसेस दिसू लागल्या आहेत. हा विषाणू एका माणसाकडून दुसऱ्या व्यक्तीमध्ये संक्रमित होतो.

मंकीपॉक्स म्हणजे काय?

मंकीपॉक्स हा देखील स्मॉल पॉक्ससारखा विषाणूजन्य आजार आहे. त्याचे नाव मंकीपॉक्स असले तरी त्याचा माकडांशी काहीही संबंध नाही. हा स्मॉल पॉक्स कुटुंबातील असल्याने आणि डीएनए विषाणू असल्याने, त्याचा आकार सामान्यतः इतर विषाणूंपेक्षा मोठा असतो. ते हवेत पसरत नाही. रुग्णाच्या संपर्कात, संक्रमित व्यक्तीच्या पुरळ किंवा उकळीतून पाण्याशी संपर्क साधून आणि लैंगिक संबंधातून पसरतो.

काँगोमध्ये 1970 मध्ये मंकिपॉक्सचा पहिला मानवी संसर्ग नोंदवला गेला. 2022 मध्ये हा विषाणू जगभरात पसरला. मंकीपॉक्स विषाणूचे दोन प्रकार आहेत. आफ्रिकेत 17 हजार रुग्ण आढळते आहेत. द. आफ्रिकेसह 13 देशांमध्ये मंकीपॉक्सचे रुग्ण आढळल्यानं चिंता व्यक्त होतेय.

Monkeypox Virus
IPS Nalin Prabhat : NSG च्या महासंचालकांची तडकाफडकी जम्मू काश्मीरमध्ये बदली; 12 तासात दिली मोठी जबाबदारी

मंकीपॉक्सची लक्षणे

थंडी जाणवणे

थकवा

त्वचेवर पुरळ

ताप, डोकेदुखी

स्नायू दुखणे आणि पाठदुखी

संक्रमित रुग्णाच्या संपर्कात आल्यानंतर तीन ते 15-17 दिवसांत लक्षणे दिसतात

ताप आल्यानंतर 1 ते 4 दिवसांनी त्वचेवर पुरळ उठू लागते.

पुरळ अनेकदा प्रथम चेहऱ्यावर दिसून येते, नंतर हात, पाय आणि इतर ठिकाणी पसरते

तज्ञांच्या मतानुसार लहान मुले, वृद्ध, आजारी आणि गरोदर महिलांना जास्त धोका असतो. संसर्ग झाल्यानंतर, रोग तीव्र होऊ शकतो. त्यामुळे बाधित रुग्णाची ओळख पटल्यानंतर त्याला तात्काळ आयसोलेशनमध्ये ठेवावे. आरोग्य विभागानेही सतर्कता बाळगून जनजागृती करण्याची गरज आहे.

Monkeypox Virus
IPS Nalin Prabhat : NSG च्या महासंचालकांची तडकाफडकी जम्मू काश्मीरमध्ये बदली; 12 तासात दिली मोठी जबाबदारी

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com