Robotic Ambulance: रशियाने तयार केला खास रोबोट; युद्धक्षेत्रात सैनिकांना अशी करतोय मदत; पाहा VIDEO

Russian Robot VIDEO: युक्रेनसोबतच्या युद्धात जखमी झालेल्या सैनिकांना वाचवण्यासाठी रशियाने एक खास रोबोट तयार केला आहे.
Russian Robotic Ambulance
Russian Robotic Ambulance Saam TV
Published On

Russian Robotic Ambulance

रशिया आणि युक्रेनमध्ये अजूनही युद्ध धुमसत असून दोन्ही देशांकडून एकमेकांवर सातत्याने हल्ले केले जात आहेत. आतापर्यंत या युद्धात शेकडो लोकांचा जीव गेला आहे. यात दोन्ही देशांमधील सैनिकांचा देखील समावेश आहे. दरम्यान, युक्रेनसोबतच्या युद्धात जखमी झालेल्या सैनिकांना वाचवण्यासाठी रशियाने एक खास रोबोट तयार केला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Russian Robotic Ambulance
Manipur Violence: हिंसाचाराच्या घटनांनी मणिपूर हादरलं, पिता-पुत्रासह चौघांची गोळ्या झाडून हत्या; परिसरात तणाव

हा रोबोट युद्धात जखमी झालेल्या सैनिकांना तातडीने उपचारासाठी मदत करणार आहे. तसेच तो युद्धभूमीतून जखमी सैनिकांना बाहेर देखील काडणार आहे. या रोबोटचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. (Latest Marathi News)

व्हिडिओमध्ये एक रोबोट जखमी सैनिकाला स्लाइडरवर ठेवून उपचासाठी घेऊन जाताना दिसत आहे. विशेष बाब म्हणजे हा रोबोट उंच ढिगाऱ्यावर आणि खडबडीत पृष्ठभागावरही सहज फिरताना दिसत आहे. रशियाने या रोबोटचे नाव ब्रातिशका ठेवले आहे.

ब्रातिशका या नावाचा अर्थ लहान भाऊ असा असून तो युद्धक्षेत्रात जखमी झालेल्या सैनिकांना वेळेवर मदत करेल. सध्या डॉनबासच्या युद्धक्षेत्रातही हा रोबोट वापरला जात आहे. डॉनबासमध्ये तैनात असलेल्या एका अनुभवी कमांडरने सांगितले, की या रोबोटचा वापर विविध परिस्थितींमध्ये केला जाऊ शकतो.

रोबोट सैनिकांना युद्धात मदत करून त्यांच्यापर्यंत शस्त्र देखील पोहचवू शकतो. ब्राटिश्का कॉन्स्टँटिन नावाच्या रशियन रोबोटिक्स इंजिनिअरने हा रोबोट तयार केला आहे. या रोबोटची लांबी 1.2 मीटर असून त्याचे वजन सुमारे 200 किलो आहे.

रोबोटमध्ये एक कॅमेरा बसवण्यात आला आहे. या रोबोटची वजन उलण्याची क्षमता 150 किलोपर्यंत आहे. एकदा चार्ज केल्यानंतर तो 5 ते 6 तास सतत काम करू शकतो. हा रोबो ताशी 10 किलोमीटरचा प्रवास करू शकतो.

Russian Robotic Ambulance
Delhi Pitampura Fire: दिल्लीत अग्नितांडव, ४ मजली इमारतीला भीषण आग; एकाच कुटुंबातील ६ जण होरपळले

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com