Manipur Violence: हिंसाचाराच्या घटनांनी मणिपूर हादरलं, पिता-पुत्रासह चौघांची गोळ्या झाडून हत्या; परिसरात तणाव

Manipur News Today: गेल्या २४ तासांमध्ये मणिपूरमध्ये हिंसाचाराच्या वेगवेगळ्या घटनांमध्ये ४ जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेकजण जखमी झाले आहेत.
Manipur Violence Latest News
Manipur Violence Latest NewsSaam TV
Published On

Manipur Violence Latest News

एकीकडे अयोध्येत प्रभू श्रीरामाच्या प्रतिष्ठापणेची जय्यत तयारी सुरू असताना दुसरीकडे मणिपूरमधील हिंसाचाराच्या घटना काही थांबण्याचं नाव घेत नाहीये. गेल्या २४ तासांमध्ये मणिपूरमध्ये हिंसाचाराच्या वेगवेगळ्या घटनांमध्ये ४ जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेकजण जखमी झाले आहेत. मृतामध्ये पिता-पुत्राचा समावेश आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Manipur Violence Latest News
Delhi Pitampura Fire: दिल्लीत अग्नितांडव, ४ मजली इमारतीला भीषण आग; एकाच कुटुंबातील ६ जण होरपळले

मिळालेल्या माहितीनुसार, बिष्णुपूर जिल्ह्यातील निंगथौखोंग खा खुनौ येथे गुरुवारी दुपारच्या सुमारास अज्ञात बंदुकधाऱ्यांनी पिता-पुत्रासह तिघांची गोळ्या झाडून हत्या केली. ओईनम बामोंजाओ, ओइनम मनिटोम्बा, थियम सोमेन अशी मृतांची नावे आहेत. हे सर्व निंगथौखॉन्ग खा कुनौ येथील रहिवासी होते. (Latest Marathi News)

त्याचबरोबर इंफाळ पश्चिम जिल्ह्यातील कांगचूप येथे मेईतेई (वय २६) या तरुणाची हत्या करण्यात आली. दरम्यान, या हत्येनंतर मणिपूरच्या दक्षिणेकडील निंगथौखॉंग मार्केटमध्ये मोठा तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी (Police) तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनाम केला. तसेच मृत व्यक्तींचे मृतदेह ताब्यात घेतले.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत व्यक्ती हे निंगथौखॉंग पाणी पुरवठा योजनेच्या पाण्याच्या टाकीतून पाणी आणत असताना, ५ अज्ञात बंदुकधाऱ्यांनी त्यांची वाट अडवली. त्याचबरोबर मारहाण करत गोळ्या झाडून त्यांची हत्या केली. हत्येनंतर आरोपी चुराचंदपूर जिल्ह्याच्या हद्दीतील जवळच्या टेकडीकडे पळून गेले.

दरम्यान, हत्या झालेल्या व्यक्तींचे मृतदेह पोलिसांनी शवविच्छेदनासाठी इम्फाळमधील RIMS रुग्णालयात ठेवले आहेत. या हत्येनंतर राज्याच्या दक्षिणेकडील निंगथौखॉंग मार्केटमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. न्यायाच्या मागणीसाठी महिलांसह अनेक पुरुष रस्त्यावर उतरले होते. सध्या पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

बुधवारपासून मणिपूरच्या विविध जिल्ह्यांमध्ये झालेल्या हिंसाचाराच्या घटनांमध्ये दोन पोलीस कमांडोसह ७ जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या वर्षी मे महिन्यापासून मणिपूरमध्ये जातीय हिंसाचार उसळला होता. या हिंसाचारात आतापर्यंत १८० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तर शेकडो लोक जखमी झाले आहेत.

Manipur Violence Latest News
Daily Horoscope: वृषभसह ३ राशींच्या व्यक्तींसाठी आज अडचणीचा दिवस; तुमची रास यात नाही ना?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com