Russia-Ukraine War: रशियन सैन्यानं युक्रेनमधील मुलांच्या रुग्णालयावर डागलं हायपरसॉनिक क्षेपणास्त्र; २४ जण ठार

Russia Hypersonic Missile Attack On Children Hospital : रशियन सैन्याने सोमवारी हायपरसॉनिक क्षेपणास्त्रांनी कीवच्या सर्वात मोठ्या मुलांच्या रुग्णालयावर हल्ला केला. हल्ल्यात किमान २४ ठार झालेत.
Russia-Ukraine War: रशियन सैन्यानं युक्रेनमधील मुलांच्या रुग्णालयावर डागलं  हायपरसॉनिक क्षेपणास्त्र; २४ जण ठार
Russia Hypersonic Missile Attack On Children Hospital AP News

गेल्या दोन वर्षापासून रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध चालू आहे. रशिया अजून जास्त आक्रमक झाला असून रशियन सैन्याने युक्रेनियन शहरे नष्ट करण्याचा धडाका लावलाय. सोमवारी रशियन सैन्याने युक्रेनची राजधानी कीवमधील अनेक भागात हायपरसोनिक क्षेपणास्त्रांचा हल्ला केला. या डझनभर क्षेपणास्त्र हल्ल्यात २४ जणांचा मृत्यू झालाय.

रशियन सैन्याने कीवमधील सर्वात मोठ्या मुलांच्या रुग्णालयावरदेखील क्षेपणास्त्र हल्ला केलाय. रुग्णालयाच्या मलब्याखाली अनेक मृतदेह गाडले गेलेत. तर जखमींना वाचवण्यासाठी बचावकार्य सुरू आहे. ढिगाऱ्यांमध्ये जखमी लोकांचा शोध सुरू असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिलीय.

रशियाच्या सैन्याने ओखमाडाईट बालरोग रुग्णालयावर क्षेपणास्त्र हल्ला केला. दिवसाढवळ्या झालेल्या बॉम्ब हल्लानंतर शोधात जखमींना शोध कार्यासाठी डझनभर स्वयंसेवक, डॉक्टर आणि बचाव कर्मचारी रुग्णालयाचा ढिगारा खणून काढत आहेत. युक्रेनमधील किवी रिह या आणखी एका शहरावरही रशियन सैन्याने हवाई हल्ले केले. या हल्ल्यात १० जणांचा मृत्यू झाला.

रशियन लष्कराकडून कीव शहरावर करण्यात आलेल्या हल्ल्यांमध्ये रुग्णालयावरील हल्ला सर्वात मोठा हल्ला असल्याचं सांगितलं जात आहे. युक्रेनियन वायुसेनेने एका निवेदनात म्हटलं की, या हल्ल्यांमध्ये रशियन अत्याधुनिक शस्त्रांपैकी एक असलेल्या किन्झाल हायपरसोनिक क्षेपणास्त्राचा समावेश होता. किन्झाल हायपरसोनिक हे आवाजाच्या १० पट वेगाने उ़डते, त्यामुळे त्याचा हल्ला परतवून लावणं किंवा रोखणं जवळजवळ अशक्य होतं. या क्षेपणास्त्र हल्ल्याने शहरातील इमारती हादरल्यात.

रशियाने वेगवेगळ्या प्रकारच्या ४० हून अधिक क्षेपणास्त्रांनी पाच शहरांना लक्ष्य केलंय. रशियाने सोमवारी युक्रेनमधील शहरांवर डझनभर क्षेपणास्त्रे डागली, यात किमान २४ जणांचा मृत्यू झालाय. असं युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी सांगितलंय.

Russia-Ukraine War: रशियन सैन्यानं युक्रेनमधील मुलांच्या रुग्णालयावर डागलं  हायपरसॉनिक क्षेपणास्त्र; २४ जण ठार
Pm Modi Russia Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे रशियात भव्य स्वागत, विमानतळावर गार्ड ऑफ ऑनरने सन्मान

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com