Russia- Ukraine भारत मिटवणार रशिया-युक्रेनमधील संघर्ष? पुतीन-झेलेन्स्की यांच्याकडून पंतप्रधान मोदींना भेटीचे आमंत्रण

Russia- Ukraine : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन्ही देशाच्या राष्ट्राध्यक्षांशी फोनवरून चर्चा केल्याची माहिती सुत्रांनी दिलीय. दोन्ही देशातील प्रमुख नेते भारताकडे शांतीदूत म्हणून पाहतात.
Russia- Ukraine
Russia- Ukraine ANI
Published On

President Vladimir Putin And Zelensky Invite PM Modi :

रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू आहे.या दोन्ही देशातील युद्ध बंद होऊन शांती प्रस्थापित व्हावी,यासाठी भारताकडून अनेक प्रयत्न केले गेले आहेत. दोन्ही देशांमध्ये शांती प्रस्थापित व्हावी करण्याची संधी परत एकदा भारताला मिळणार आहे. दोन्ही देशांच्या राष्ट्राध्यक्षांकडून पंतप्रधान मोदींना देशाचा दौरा करण्याचे आमंत्रण मिळाले आहे. (Latest News)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन्ही देशाच्या राष्ट्राध्यक्षांशी फोनवरून चर्चा केल्याची माहिती सुत्रांनी दिलीय. दोन्ही देशातील प्रमुख नेते भारताकडे शांतीदूत म्हणून पाहतात. झेलेन्स्की आणि पुतीन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकसभा निवडणुक झाल्यानंतर त्यांच्या देशाला भेट देण्याचे आमंत्रण दिले आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशिया देशाचा अखेरचा दौरा २०१८ मध्ये केला होता.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पंतप्रधान मोदी यांनी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांच्याशी फोनवर चर्चा केलीय. रशिया आणि युक्रेनमधील संघर्ष लवकर समाप्त करण्यासाठी भारताकडून अनेक प्रयत्न केले जात आहेत. भारत युक्रेनला मानवी साहाय्यता कायम देत राहील. राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी युक्रेनमधील लोकांना भारताने सुरू असलेल्या सहकार्याचे कौतुक केल आहे. पंतप्रधान मोदींनी 'X' वरील पोस्टमध्ये याविषयीची माहिती दिलीय.

"भारत-युक्रेन भागीदारी मजबूत करण्यावर राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्याशी चांगली चर्चा झाली.सर्व शांतता प्रयत्नांना भारताचा सतत पाठिंबा आणि चालू संघर्ष लवकर संपवण्याचा संदेश दिलाय. भारत त्याच्या लोककेंद्रित दृष्टिकोनानुसार मानवतावादी मदत पुरवत राहील, असं मोदींनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय. तसेच रशिया आणि युक्रेन यांच्यात फेब्रुवारी २०२२ मध्ये युद्ध सुरू झाले. या युद्ध काळात भारताने मुत्सद्देगिरी आणि चर्चेवर भर दिला.परराष्ट्र मंत्रालयाने पत्रकार परिषदेत सांगितले की, "दोन्ही देशांदरम्यान चर्चा, मुत्सद्देगिरी, सतत संवाद व्हावा, जेणेकरून दोन्ही बाजू एकत्र येऊन शांतता प्रस्थापित करू शकतील, अशी भारताची इच्छा आहे." असंही पंतप्रधान मोदी म्हणालेत.

झेलेन्स्की यांच्याशी बोलण्यापूर्वी बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशीही फोनवर चर्चा केलीय. त्यांच्या दूरध्वनी संभाषणादरम्यान दोन्ही नेत्यांनी भारत-रशिया 'स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप' वाढवण्याचे प्रयत्न अधिक करण्यास सहमती दर्शवली. पंतप्रधान मोदींनी सोशल मीडिया साइट X वर लिहिले की त्यांनी राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्याशी चर्चा केली. रशियाच्या राष्ट्राध्यक्ष पदावर परत विराजमान झाल्यानंतर पंतप्रधान मोदींनी पुतीन यांचे अभिनंदन केल.

रशियाचे बलाढ्य नेते व्लादिमीर पुतीन यांनी राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक प्रचंड बहुमताने जिंकलीय. पुतीन यांनी विक्रमी मतांच्या टक्केवारीसह पाचव्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक जिंकलीय. रशियाच्या केंद्रीय निवडणूक आयोगाने सोमवारी सांगितले की, व्लादिमीर पुतिन यांनी देशातील राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला असून जिंकली. निवडणुकीत पुतीन यांचा विजय देशाच्या राजकीय व्यवस्थेवरील त्यांचे नियंत्रण अधोरेखित होते. पुतीन यांना केवळ ३ नाममात्र उमेदवारांचा सामना करावा लागला आणि युक्रेन युद्धाला विरोध करणाऱ्या कोणालाही पुतीन यांच्या विरोधात लढण्याची परवानगी नव्हती.

Russia- Ukraine
Russsia-Ukraine: रशिया-युक्रेनच्या युद्धात भारतीय तरुणांना पाठवणाऱ्या रॅकेटचा पदार्फाश; सीबीआयची कारवाई

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com