Russia Ukraine War: रशिया-युक्रेनमध्ये पुन्हा युद्धाचा भडका; क्षेपणास्त्र हल्ल्यात तिघांचा मृत्यू, ३६ जण जखमी

Russia Ukraine War News: रशिया-युक्रेनमध्ये पुन्हा युद्धाचा भडका उडण्याची शक्यता आहे. कारण, रशियन सैनिकांनी मंगळवारी (ता. १२) युक्रेनमधील क्रिवी रिह शहरावर थेट क्षेपणास्त्राने हल्ला केलाय.
Russia Ukraine War
Russia Ukraine WarSaam TV
Published On

Russian Missile Hits Ukraine Buildings

रशिया-युक्रेनमध्ये पुन्हा युद्धाचा भडका उडण्याची शक्यता आहे. कारण, रशियन सैनिकांनी मंगळवारी (ता. १२) युक्रेनमधील क्रिवी रिह शहरावर थेट क्षेपणास्त्राने हल्ला केलाय. मीडिया रिपोर्टनुसार, या हल्ल्यात युक्रेनच्या ३ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय ३६ जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी काहींची प्रकृती चिंताजनक आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Russia Ukraine War
Weather Forecast: देशातील तब्बल ११ राज्यांना तुफान पावसासह गारपिटीचा इशारा; महाराष्ट्रात कसं असेल हवामान?

गेल्या अनेक वर्षांपासून रशिया आणि युक्रेन या दोन देशांमध्ये वाद सुरू आहे. या वादातून दोन्ही देश एकमेकांवर सातत्याने हल्ले करीत आहेत. आतापर्यंत या हल्लात दोन्ही देशांमधील हजारो नागरिकांचा जीव गेलाय. हे युद्ध लवकरात लवकर थांबावं यासाठी जगभरातील देश मध्यस्थी करीत आहेत.

अशातच रशियाच्या लष्कराने मंगळवारी मध्य युक्रेनमधील क्रिवी रिह शहरावर क्षेपणास्त्र हल्ला केला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, रशियन क्षेपणास्त्रे दोन निवासी इमारतींवर पडली. यामध्ये तीन लोकांचा जागीच मृत्यू झाला. याशिवाय ३६ जण जखमी झाले. जखमींमध्ये सात मुलांचाही समावेश आहे. (Latest Marathi News)

क्रिवी रिह हे युक्रेनियन राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांचे मूळ शहर आहे. क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर झेलेन्स्की यांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये सांगितले की, "रशियन क्षेपणास्त्र हल्ल्यात दोन इमारती कोसळल्या असून तिघांचा मृत्यू झाला. ३६ जण जखमी झाले आहेत. मृतांची संख्या वाढण्याची शक्यता असून आम्ही बचावकार्य करीत आहोत".

दरम्यान, रशियाविरुद्ध युद्ध लढणाऱ्या युक्रेनला शस्त्राचा पुरवठा करण्याचा निर्णय अमेरिकेने घेतला आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अमेरिकन संरक्षण मंत्रालय पेंटागॉन युक्रेनला 300 दशलक्ष डॉलर्स किमतीची अतिरिक्त शस्त्रे पुरवणार आहे. दुसरीकडे पेंटागॉनला त्याचे शस्त्रागार पुन्हा भरण्यासाठी निधीची कमतरता आहे.

Russia Ukraine War
PM Narendra Modi : नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान बनतील, अमेरिकेतील खासदाराने व्यक्त केला विश्वास

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com