PM Narendra Modi : नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान बनतील, अमेरिकेतील खासदाराने व्यक्त केला विश्वास

PM Narendra Modi News : जॉर्जियामधून रिपब्लिकन पक्षाचे खासदार रिच मॅककार्मिक यांनी म्हटलंय की, पंतप्रधान नरेंद्र मोदी खूप लोकप्रिय आहे.
PM modi
PM modiSaam TV
Published On

PM Narendra Modi News :

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता फक्त भारतातच नाही, तर जगभरात आहे. पंतप्रधान मोदींची दखल जगभरातील अनेक देश घेतात. आंतरराष्ट्रीय स्थरावरील अनेक बड्या राजकीय नेत्यांसोबत पंतप्रधान मोदी चे मैत्रीपूर्ण संबंध आहेत.

अमेरिकेतील एका खासदाराने पंतप्रधान मोदींचं तोंडभरुन कौतुक केलं आहे. नरेंद्र मोदी पुन्हा भारताचे पंतप्रधान होतील, असा दावा देखील त्यांनी केला आहे.

PM modi
Haryana CM: हरियाणाआधी या राज्यांमध्येही भाजपने बदलले होते मुख्यमंत्री, निवडणुकीत काय झाला होता फायदा?

जॉर्जियामधून रिपब्लिकन पक्षाचे खासदार रिच मॅककार्मिक यांनी म्हटलंय की, पंतप्रधान नरेंद्र मोदी खूप लोकप्रिय आहे. मी भारतात गेलो होतो तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इतर खासदारांसोबत होतो.तेथे एका पार्टीचे आयोजन करण्यात आलं होतं. तिथे मी पंतप्रधान नरेंद्र मोदींची लोकप्रियता अनुभवली. त्यामुळे मोदी पुन्हा भारतात पंतप्रधान बनतील, असा मला विश्वास आहे. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा प्रभाव मी सकारात्मकपणे पाहतो आहे. देशाची अर्थव्यवस्था, देशाचा विकास, नागरिकांचं हित याबाबत मोदींचा दृष्टीकोण सकारात्मक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात भारताची अर्थव्यवस्था वार्षिक ४-८ टक्क्यांनी वाढत आहे, असं रिच मॅककार्मिक यांनी म्हटलं.

PM modi
PM मोदींनी ऋषी सुनक यांना केला फोन, कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?

मॅककार्मिक यांनी पुढे म्हटलं की, भारताची अर्थव्यवस्था वेगाने वाढत आहे. भारताचा जीडीपी जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या जीडीपींपैकी एक आहे. त्यामुळे अवघ्या जगाचं लक्ष भारताकडे आहे. चीन आणि अमेरिका या स्पर्धेत काय भूमिका घेतात, हे देखील महत्त्वपूर्ण आहे.

सकाळ सुमहाच्या सर्वेक्षणाची आकडेवारी?

सकाळ समुहाने केलेल्या सर्वेक्षणात मतदान करताना आपले प्राधान्य कोणाला असेल? असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावर भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) 40.3 टक्के लोकांनी आपली पसंती दर्शवलीय. तर इंडिया / महाविकास आघाडीला 45.7 टक्के लोकांनी पसंती दर्शवली आहे. तर तर 10.3 टक्के लोकांनी यापैकी कोणीही नाही, असं म्हटलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com