PM मोदींनी ऋषी सुनक यांना केला फोन, कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?

Pm Modi And Rishi Sunak: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्याशी फोनवरून चर्चा केली.
Pm Modi And Rishi Sunak
Pm Modi And Rishi SunakSaam Tv
Published On

PM Modi Dials Prime Minister of the United Kingdom Rishi Sunak:

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्याशी फोनवरून चर्चा केली. त्यांनी स्वतः सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर एका पोस्टद्वारे ही माहिती दिली. दोन्ही देशांमधील सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारी मजबूत करण्यावर चर्चा झाल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले.

पंतप्रधान मोदी ट्वीट करत म्हणाले आहे की, ''ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्याशी चांगली चर्चा झाली. द्विपक्षीय सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारी आणखी मजबूत करण्यावर आम्ही चर्चा केली. परस्पर फायदेशीर मुक्त व्यापार कराराच्या लवकर निष्कर्षासाठी काम करण्याच्या आमच्या वचनबद्धतेचाही पुनरुच्चार केला.''  (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Pm Modi And Rishi Sunak
Manohar Lal Khattar: भाजपने अचानक मनोहर लाल खट्टर यांना मुख्यमंत्रीपदावरून का हटवले? जाणून घ्या इनसाईड स्टोरी

ब्रिटिश पंतप्रधान भारतीय वंशाचे आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांनी सांगितले होते की, त्याला लहानपणी वर्णद्वेषाचा सामना करावा लागला होता. वर्ष 2022 मध्ये सत्ताधारी कंझर्व्हेटिव्ह पक्षाच्या नवीन नेत्याची निवड झाल्यानंतर, राजा चार्ल्स तिसरा यांनी सुनक यांना पंतप्रधान म्हणून नियुक्त केलं. ब्रिटिश पंतप्रधान म्हणून निवड होणारे ते पहिले भारतीय वंशाचे पहिले व्यक्ती बनवले. सुनक हे 210 वर्षांतील सर्वात तरुण ब्रिटनचे पंतप्रधान आहेत.  (Latest Marathi News)

दरम्यान, ब्रिटनमधील लंडन येथील भारतीय उच्चायुक्तांनी ‘चलो इंडिया’ आणि ‘लिव्हिंग ब्रिज’ या दोन मोठ्या मोहिमा सुरू केल्या आहेत. चलो इंडिया मोहीम पर्यटनाला चालना देण्यासाठी आहे. तर लिव्हिंग ब्रिज मोहीम ब्रिटनमध्ये भारतीय वंशाच्या लोकांच्या योगदानाचा उत्सव साजरा करण्यासाठी आहे.

Pm Modi And Rishi Sunak
Electoral Bond Case: निवडणूक आयोगाला मिळाला इलेक्टोरल बाँड्सचा डेटा, SC ने फटकारल्यानंतर SBI ने दिली माहिती

चलो इंडिया ग्लोबल डायस्पोरा मोहिमेची घोषणा पंतप्रधान मोदींनी या आठवड्याच्या सुरुवातीला श्रीनगरमध्ये भारतीय समुदायाच्या सदस्यांना त्यांच्या गैर-भारतीय मित्रांसह भारतातील पर्यटन स्थळांना भेट देण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी केली होती.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com