Electoral Bond Case: निवडणूक आयोगाला मिळाला इलेक्टोरल बाँड्सचा डेटा, SC ने फटकारल्यानंतर SBI ने दिली माहिती

Electoral Bond: स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) मंगळवारी इलेक्टोरल बाँड्सचा संपूर्ण डेटा निवडणूक आयोगाला पाठवला आहे.
Electoral Bond Case
Electoral Bond CaseSaam Tv
Published On

Electoral Bond Case:

स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) मंगळवारी इलेक्टोरल बाँड्सचा संपूर्ण डेटा निवडणूक आयोगाला पाठवला आहे. एसबीआयला मोठा झटका देत सर्वोच्च न्यायालयाने काल इलेक्टोरल बाँड्सशी संबंधित माहिती उघड करण्याची मुदत वाढवून देण्याची मागणी करणारी याचिका फेटाळून लावली होती.

तसेच एसबीआयने 12 मार्च रोजी कामाचे तास संपेपर्यंत निवडणूक आयोगाला इलेक्टोरल बाँड्सची संपूर्ण माहिती द्यावी, असे आदेश न्यायालयाने दिले होते. एसबीआयने मंगळवारी संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत संपूर्ण डेटा निवडणूक आयोगाला पाठवला आहे. साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Electoral Bond Case
Maharashtra Election 2024 Survey: देशात भाजपला पहिली पसंती, मात्र महाराष्ट्रात वेगळा निकाल; सर्वेक्षणातून समोर आली टेन्शन वाढवणारी आकडेवारी

सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाने 15 मार्च रोजी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत एसबीआयद्वारे दिलेला डेटा त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर प्रकाशित करण्याचे निर्देशही निवडणूक आयोगाला दिले होते. आता एसबीआयने डेटा पाठवल्यानंतर निवडणूक आयोगाला 15 मार्चपर्यंत आपल्या वेबसाइटवर प्रकाशित करावा लागेल.  (Latest Marathi News)

सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीत न्यायमूर्ती संजीव खन्ना, न्यायमूर्ती बी.आर. गवई, न्यायमूर्ती जे.बी. पारडीवाला आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा उपस्थित होते. खंडपीठाने एसबीआयला नोटीस बजावून म्हटले आहे की, जर बँक त्यांच्या निर्देशांचे वेळेचे पालन करण्यात अयशस्वी ठरली तर सर्वोच्च न्यायालय त्याच्या 15 फेब्रुवारीच्या निकालाच्या जाणीवपूर्वक अवज्ञा केल्याबद्दल कारवाई करू शकते.

Electoral Bond Case
Lok Sabha Survey: राज्यात भाजप आघाडी घेणार की, मविआ बाजी मारणार? लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्राचा कल कुणाकडे? सर्वेक्षणातून समोर आली माहिती

न्यायालयाने इलेक्टोरल बाँड योजना केली रद्द

दरम्यान, 15 फेब्रुवारी रोजी ऐतिहासिक निकाल देताना पाच सदस्यीय घटनापीठाने केंद्राच्या इलेक्टोरल बाँड योजनेला असंवैधानिक ठरवून 13 मार्चपर्यंत देणगीदार, देणगी म्हणून दिलेली रक्कम आणि देणगी प्राप्तकर्त्यांची माहिती देण्याचे आदेश निवडणूक आयोगाला दिले होते. लोकसभा निवडणुकीपूर्वी आलेल्या या निर्णयात न्यायालयाने इलेक्टोरल बॉण्ड योजना तात्काळ बंद करण्याचे आदेश दिले होते. तसेच एसबीआयला 12 एप्रिल 2019 पासून खरेदी केलेल्या इलेक्टोरल बाँड्सचा डेटा देण्यात सांगण्यात आलं होतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com