रशिया बनवतंय अमरत्वाचं औषध? रशियाचा 26 बिलियन डॉलरचा 'महाप्रोजेक्ट'

Putin’s Big Gamble: माणसाला अमरत्व मिळणं शक्य आहे का? हा प्रश्न सर्वांनाच पडत असतो...मात्र याचं उत्तर शोधण्यासाठी रशियानं मोठं संशोधन सुरू केलंय. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी हा महाडा प्रोजेक्ट हाती घेतलाय. आपल्या देशातील नागरिकांचं वार्धक्य तारुण्यात बदलण्यासाठी त्यांनी ही योजना आखलीय. यासाठी रशियानं तब्बल 26 बिलियन डॉलर म्हणजेच 2 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च करण्याची तयारी सुरू केलीय.
Russia’s ambitious $26 billion project aims to slow aging and extend human lifespan through advanced biotechnology.
Russia’s ambitious $26 billion project aims to slow aging and extend human lifespan through advanced biotechnology.saam tv
Published On

रशिया सरकारनं 'आरोग्य संवर्धनासाठी नवीन तंत्रज्ञान राष्ट्रीय प्रकल्प' सुरू केलाय. या प्रकल्पांतर्गत रशिया वार्धक्य रोखण्यासाठी जनुकीय उपचार विकसित करत आहेत. विशेष म्हणजे, वार्धक्याविरुद्धच्या लढाईत हे एक मोठं शस्त्र ठरू शकते, असा दावा रशियाने केलाय. 2030 पर्यंत 1 लाख 75 हजार नागरिकांचे प्राण वाचवण्याच्या उद्दिष्टानं हा प्रकल्प 2024 मध्ये सुरू करण्यात आला. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यासोबतच्या संभाषणादरम्यान पुतिन यांनी केलेल्या दाव्याशीही या संशोधनाचा संबंध जोडला जात आहे. शी जिनपिंग यांनी यावर आश्चर्य व्यक्त केल्याचं रशियानं स्पष्ट केलं होतं.

इतकंच नव्हे तर, मानवी शरीरातील जुन्या आणि निकामी झालेल्या पेशी नष्ट करण्यासाठी रशियन वैज्ञानिक एका विशेष 'अँटी-एजिंग व्हॅक्सीन' वरही काम करत असल्याची चर्चा सुरू आहे. 26 बिलियन डॉलरच्या संशोधन प्रकल्पात तीन महत्तवाचे टप्पे आहेत.

जीन थेरपी - रशियन शास्त्रज्ञ पेशींचं वार्धक्य कमी करण्यासाठी एक जीन थेरपी विकसित करत आहेत. ही थेरपी डीएनए स्तरावर वृद्धत्वाची प्रक्रिया प्रभावित करेल, असं रशियन सरकारनं म्हटलंय.

बायोप्रिंटिंग - शास्त्रज्ञांनी मानवी अवयवांच्या ऊतींपासून उंदराची थायरॉईड ग्रंथी बायोप्रिंट केल्याचा दावा केलाय. 2030 पर्यंत बायोप्रिंटेड अवयव प्रत्यारोपण यशस्वीरित्या राबवण्याचे रशियाचं उद्दिष्ट आहे.

जेनोट्रान्सप्लांटेशन - मानवी उपचारांसाठी लहान डुकरांमध्ये अवयव तयार केले जातात. गरज भासल्यास हे अवयव मानवी शरीरात प्रत्यारोपित केले जाऊ शकतात. यामुळे मूत्रपिंड, हृदय आणि यकृत विकसित करणे शक्य होईल, असा दावा रशियानं केलाय.

विशेष म्हणजे, या प्रकल्पाचं नेतृत्व पुतीन यांची कन्या करत असल्याचं बोललं जातंय. मात्र, रशियाची घटती लोकसंख्या आणि आपल्या सहकाऱ्यांचे वाढते वय ही पुतिन यांच्यासाठी चिंतेची बाब असल्याची चर्चा आहे. त्यामुळे हा प्रकल्प पुतीन यांना उपयुक्त ठरू शकतो, असा अंदाज व्यक्त केला जातो. मात्र, अशा पद्धतीचा संशोधन प्रकल्प राबवणारे पुतिन हे काही पहिलेच व्यक्ती नाहीत. 1920 मध्ये, अलेक्झांडर ओग्दानोव्ह यांनीही तारुण्य परत मिळवण्यासाठी रक्त संक्रमण करून घेतले होते. मात्र, स्वतःवर उपचार करण्याच्या प्रयत्नात त्यांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे पुढील काळात आपल्या देशातील नागरिकांचं वार्धक्य रोखण्यात रशियाला कितपत यश मिळणार? हे पाहणं महत्त्वाचं असेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com