
Republic Day 2023: गुरुवारी २६ जानेवारी रोजी देशभरात मोठ्या उत्साहात प्रजासत्ताक दिन साजरा केला जाणार आहे. त्यासाठी देशात जय्यत तयारी देखील सुरू आहे. इंग्रजांच्या गुलामगिरीतून भारत स्वातंत्र झाल्यानंतर २६ जानेवारी १९५० रोजी देशाने संविधान लागू केले. त्यामुळे हा दिवस (Republic Day) दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
दरवर्षीप्रमाणे यंदा देखील या दिवशी देशभरात विविध सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले आहे. परंतु अनेकांना हा प्रजास्ताक दिन ७४वा की ७३वा याबाबत संभ्रम आहे.
यंदा कितवा प्रजासत्ताक दिवस?
यंदा २६ जानेवारी रोजी देशभरात ७४वा प्रजासत्ताक दिन साजरा केला जाणार आहे. 26 जानेवारी 1950 रोजी देशात संविधान लागू करण्यात आले होते. भारताचे पहिले राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांनी २१ तोफांची सलामी देऊन राष्ट्रध्वज फडकावला होता. तेव्हापासून दरवर्षी हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवसापासून देशात नागरिकांचे राज्य म्हणजेच लोकशाही स्थापित झाली आहे.
असा साजरा केला जातो प्रजासत्ताक दिन
दरवर्षी प्रजासत्ताक दिनी म्हणजे २६ जानेवारीला राजधानी दिल्लीमध्ये इंडिया गेट येथील कर्तव्यपथवर राष्ट्रपतीच्या हस्ते ध्वजारोहन सोहळा पार पडतो. या विशेष प्रसंगी कर्तव्यपथवर भव्य परेड (Republic day parade) देखील होते. या परेडमध्ये देशाचे संरक्षण दल सहभागी होतात. ही परेड कर्तव्यपथवरून लाल किल्ल्यापर्यंत असते. तसेच देशातील विविध राज्यातील विविधता आणि सांस्कृती दर्शवणारे चित्ररथ देखील या कार्यक्रमात दाखवले जातात.
कुठे साजरा झाला पहिला प्रजासत्ताक दिन?
२६ जानेवारी १९५० रोजी सकाळी १० वाजून १८ मिनिटांनी देशात संविधान लागू करण्यात आले होते. त्यानंतर ६ मिनिटांनी देशाचे पहिले राष्ट्रपती डॉ राजेंद्र प्रसाद यांनी इरविन स्टेडियममध्ये देशाचा राष्ट्रध्वज तिरंगा फडकावला होता. या दिवशी पहिल्यांदा जुन्या लाल किल्ल्यासमोरील इरविन स्टेडियममध्ये परेडचे आयोजन करण्यात आले होते. या इरविन स्टेडियमला नंतर नॅशनल स्टेडियम आणि आता मेजर ध्यानचंद नॅशनल स्टेडियम असे नाव देण्यात आले आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.