Republic Day 2023: यंदा प्रजासत्ताक दिनी खास आकर्षण! कर्तव्यपथवरील परेडमध्ये दिसणार प्रवासी ड्रोन

Republic Day 2023: दरवर्षीप्रमाणे यंदा देखील प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्लीत कर्तव्यपथवर भव्य परेड होणार आहे. या परेडमध्ये प्रवासी ड्रोन हे खास आकर्षण असेल.
Republic Day 2023
Republic Day 2023Saam tv
Published On

Republic Day : यंदा २६ जानेवारीला देशात ७४वा प्रजासत्ताक दिन साजरा केला जाणार आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही राजधानी दिल्लीत भव्य परेड होणार आहे. मात्र यावेळी प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये अनेक नवे विक्रम प्रस्थापित होणार आहेत. केंद्र सरकारने 'राजपथ'चे नाव बदलून 'कर्तव्य पथ' केल्यानंतर येथे प्रथमच प्रजासत्ताक दिनाची परेड होणार आहे हे या प्रजासत्ताक दिनाचे वैशिष्ट्ये असेल. तसेच यंदा प्रथमच परेडमध्ये 'मेड इन इंडिया' शस्त्रे दाखवण्यात येणार आहेत. (Latest Marathi News)

Republic Day 2023
Brijbhushan Singh : बृजभूषण शरण सिंह यांच्यावरील आरोपाची चौकशी होणार, मेरी कॉमच्या नेतृत्वातील समितीवर जबाबदारी

प्रजासत्ताक दिन (Republic Day) अवघ्या दोन दिवसांवर आला आहे. त्यामुळे देशभरात हा उत्सव जल्लोषात साजरा करण्यासाटी जोमाने तयारी सुरू आहे. कर्तव्यपथवर एकीकडे हवाई दलाची 50 विमाने आपला पराक्रम दाखवणार असून आणखी एक खास गोष्ट या परेडमध्ये पाहायला मिळणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या परेडमध्ये भारतातील पहिल्या पॅसेंजर ड्रोन पहायला मिळणार आहे. या प्रवासी ड्रोनला वरुण असे नाव देण्यात आले आहे. पुण्याच्या सागर डिफेन्स इंजिनीअरिंगने ते तयार केले असल्याची माहिती आहे. हे खास ड्रोन पाहण्यासाठी लोक अतिशय उत्सुक आहेत.

या पॅसेंजर ड्रोनचे वैशिष्ट्ये म्हणजे त्यात एक व्यक्ती प्रवास करू शकते. हे प्रवासी ड्रोन 130 किलो वजनासह सुमारे 25 किलोमीटरपर्यंत उड्डाण करू शकते आणि एकदा उड्डाण केल्यानंतर 25 ते 33 मिनिटे ते हवेत राहू शकते. सागर डिफेन्स इंजिनिअरिंगचे सह-संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक कॅप्टन निकुंज पराशर यांनी याबाबत माहिती दिली आहे.

Republic Day 2023
Imtiyaz Jaleel : रंग काय कोणाच्या बापाची जहागीर आहे का?, इम्तियाज जलील संतापले; थेट मोदींना केला सवाल

कॅप्टन निकुंज पराशर यांनी सांगितले की, नौदलाच्या 'मेक इन इंडिया' उपक्रमाचा भाग म्हणून प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये पॅसेंजर ड्रोन वरुणाचा समावेश करणे ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे. स्वदेशी तंत्रज्ञान विकसित करणे हे वरुण ड्रोनचे मुख्य ध्येय आहे. याशिवाय रणांगणावरील आघाडीच्या सैनिकांचे (Soldier) संरक्षण करण्यासाठी, राष्ट्रीय पाळत ठेवण्यासाठी आणि सुरक्षेत सुधारणा करण्यासाठी याचा वापर केला जाऊ शकतो.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com