Brijbhushan Singh : बृजभूषण शरण सिंह यांच्यावरील आरोपाची चौकशी होणार, मेरी कॉमच्या नेतृत्वातील समितीवर जबाबदारी

चौकशी पूर्ण होईपर्यंत कुस्ती महासंघाचं काम देखील मेरी कॉमच पाहणार आहे.
Wrestler
Wrestler Saam TV
Published On

नवी दिल्ली : भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात महिला पहलवानांनी लैगिक शोषणाचे गंभीर आरोप केले आहेत. बृजभूषण सिंह यांना कुस्ती महासंघावरून हटवण्यात यावं तसंच भारतीय कुस्ती महासंघ बरखास्त करण्यात यावी या मागणीसाठी आंतराराष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंनी दिल्लीच्या जंतरमंतरवर मैदानावर तीन दिवस आंदोलन केलं होतं.

या आंदोलनादरम्यान केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने या सर्व प्रकरणाच्या चौकशीसाठी भारतीय ऑलम्पिक संघाची 7 सदस्यीय समितीची घोषणा केली आहे. ही समिती बृजभूषण सिंह यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपासंदर्भात चौकशी करणार असून या समितीचं प्रमुख पद मेरी कॉम यांच्याकडे असणार आहे. चौकशी पूर्ण होईपर्यंत कुस्ती महासंघाचं काम देखील मेरी कॉमच पाहणार आहे. (Latest News Update)

Wrestler
INDvsNZ 3rd ODI: टीम इंडियाला नंबर-1 बनण्याची सूवर्णसंधी, आजच्या सामन्यात अशी असू शकते प्लेईंग-11

समिती बृजभूषण शरण सिंह यांच्यावरील आरोपांची ४ आठवड्यांच्या आत चौकशी करणार आहे. या समितीत मैरी कॉम सह डोला बॅनर्जी, अलकनंदा अशोक, योगेश्वर दत्त, सहदेव यादव आणि 2 कायदा तज्ज्ञांचा समावेश असणार आहे. जोपर्यत ही चौकशी आपला अहवाल सरकारला सोपवत नाही तोपर्यंत बृजभूषण शरण सिंह कुस्ती महासंघापासून स्वतःला बाजू ठेवतील आणि चौकशीमध्ये सहकार्य करतील. तोपर्यंत कुस्ती महासंघांचे काम एक समिती करेल.

आंदोलनादरम्यान खेळाडूंच्या हेतूवर शंका उपस्थित करणारे कुस्ती महासंघाचे सचिव विनोद तोमर यांना क्रीडा मंत्रालयाने निलंबित केलं आहे. तोमर यांनी ब्रृजभूषण शरण सिंह यांच्या समर्थनार्थ धरणे धरणाऱ्या कुस्तीपटूंच्या हेतूवर प्रश्न उपस्थित केल्याने त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली.

Wrestler
Viral Video : विमानात हवाईसुंदरीसोबत प्रवाशाचे गैरवर्तन; धक्कादायक व्हिडीओ आला समोर

दरम्यान आंदोलन सुरु असताना केंद्र सरकारच्या क्रीडा मंत्रालयाने 72 तासात कुस्ती महासंघाला या संदर्भात आपलं म्हणणं मांडण्यास सांगितलं होतं. कुस्ती महासंघाने यानंतर आपलं म्हणणं केंद्र सरकारला कळवलं असून यात त्यांनी लैंगिक शोषणाचे सर्व आरोप फेटाळले आहेत.

कुस्ती महासंघाने काय म्हटलंय?

लैंगिक छळाचे आरोप निराधार असून हे आरोप आम्ही मान्य करत नाही. कुस्ती महासंघाच्या लैंगिक छळ समितीकडे अशी कोणतीही तक्रार आलेली नाही. या प्रकरणात कुठलंही तथ्य नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com