Raymondचे माजी अध्यक्ष आणि पद्म भूषण डॉ. विजयपत सिंघानिया यांचे निधन

Raymond Former Chairman Vijaypat Singhania Passes Away : गौतम सिंघानिया यांचे वडील आणि रेमंड ग्रुपचे माजी अध्यक्ष विजयपत सिंघानिया यांचे वयाच्या ८७ व्या वर्षी निधन झाले आहे. त्यांच्या पार्थिवावर आज मुंबईत अंत्यसंस्कार करण्यात येतील
 Raymond Former Chairman Vijaypat Singhania Passes Away
Veteran industrialist and former Raymond Chairman Vijaypat Singhania passes away at 87 in Mumbai.
Published On

गौतम सिंघानिया यांचे वडील आणि रेमंड ग्रुपचे माजी अध्यक्ष, डॉ. विजयपत सिंघानिया यांचे वयाच्या निधन झाले आहे. ते ८७ व्या वर्षांचे होते. रेमंड समूहाचे सध्याचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, गौतम सिंघानिया यांनी इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर विजयपत सिंघानिया यांच्या निधनाची बातमी दिली.

रेमंड ग्रुपच्या प्रवक्त्याने ही विजयपत सिंघानिया यांच्या निधनाच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. विजयपत सिंघानिया यांच्या पार्थिवावर आज दुपारी अंत्यसंस्कार करण्यात येतील. पद्मभूषण पुरस्कार विजेते विजयपत सिंघानिया हे एक कुशल वैमानिकही होते. त्यांच्या नावावर हॉट एअर बलूनमधून सर्वाधिक उंची गाठण्याचा जागतिक विक्रम होता.त्यांनी २००० सालापर्यंत दोन दशके रेमंडचे अध्यक्ष म्हणून काम पाहिले होते.

कंपनीच्या प्रवक्त्याने सांगितले की, 'पद्मभूषण पुरस्कार विजेते, रेमंडचे माजी अध्यक्ष आणि मुंबईचे माजी शेरीफ, विजयपत सिंघानिया यांचे आज संध्याकाळी निधन झाले.' त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार २९ मार्च २०२६ रोजी करण्यात येतील. आम्ही सर्वजण अत्यंत दुःखी आहोत आणि त्यांच्या आत्म्यास शांती लाभो अशी प्रार्थना करतो."

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com