Rapido Viral Video: रॅपिडोचालकाचं अश्लील कृत्य! बाईकवर बसलेल्या महिलेला केला स्पर्श; VIDEO शेअर करत म्हणाली...

Rapido Driver Misbehave With Bengluru Women: रॅपिडोतालकाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये रॅपिडोचालक एका महिलेला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करताना दिसत आहे.
Rapido Viral Video
Rapido Viral VideoSaam Tv
Published On

सध्या ओला- उबर आणि रॅपिडोने प्रवास करण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. गर्दीच्या वेळी वाहतूक कोंडीतून लवकरात लवकर पोहचावे यासाठी रॅपिडोचा वापर करतात. रॅपिडोमुळे बाईकवरुन आपण जलद आपल्याला हव्या त्या ठिकाणी पोहचू शकतो. यासाठी एक अॅप आहे. या अॅपवर आपण रॅपिडो बुक केली की ड्रायव्हर आपल्याला बाईकवरुन सोडतात. दरम्यान, नुकताच सोशल मीडियावर एका रॅपिडो ड्रायव्हरचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा रॅपिडोचालक महिलेला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करताना दिसत आहे.

Rapido Viral Video
दिवाळीत बोनसऐवजी दिली सोनपापडी; कामगार भडकले, कंपनीच्या गेटवरच डबे फेकले, Video Viral

बंगळुरुमध्ये ही घटना घडली आहे. एका मुलीने सोशल मीडियावर रॅपिडोचालकाचा व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात तो तिला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करताना दिसत आहे. या घटनेमुळे त्या मुलीच्या मनावर खूप वाईट परिणाम झाला आहे. तिने सोशल मीडियावर पोस्ट करत याबाबत संपूर्ण माहिती दिली आहे.

रॅपिडोचालकाचं विचित्र कृत्य

महिलेने आपल्या पोस्टमध्ये लिहलंय की, ६ नोव्हेंबर रोजी मी बंगळुरुमध्ये चर्च स्ट्रीट येथू माझ्या पीजीला जाण्यासाठी मी रॅपिडो बुक केली. यावेळी मी ड्रायव्हरच्या मागे बसली होती. तर या चालकाने माझ्या पायाला पकडण्याचा प्रयत्न केला. हे सर्व काही सेकंदात घडलं की, मला काय करावं हे कळलंच नाही. त्यानंतरही त्याने पुन्हा तसंच केलं.

रॅपिडो चालकाने सतत या महिलेच्या पायाला हात लावण्याचा प्रयत्न केला. यावेळी ती त्याला म्हणाली की,काय करतोय?,असं नको करुस, पण एवढं बोलूनदेखील तो थांबला नाही. तो माझा पायाचा तसाच स्पर्श करत होता. मी शहरात नवीन होती म्हणून मी बाईक थांबवायलादेखील सांगू शकत नाही.

यानंतर जेव्हा मी माझ्या पीजीजवळ पोहचली तेव्हा माझं अंग पुर्णपणे थरथरत होतं, मी रडली. तिथे उभ्या असलेल्या एका माणसाने मला काय झालं असं विचारलं. त्यावेळी मी त्याला घडलेला सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर ते रॅपिडो ड्रायव्हरला ओरडले. त्याने माझी माफी मागितली. परंतु निघून जाताना त्याने माझ्याकडे बघून पुन्हा विचित्र हातवारे केले. यामुळे मी अजूनचं घाबरली, असं तिने सांगितलं.

Rapido Viral Video
Crime News : पोलिसांचा धाक उरला नाही? छठ पूजेदरम्यान दोन गटात तुंबळ हाणामारी, नेमकं काय घडलं? video viral

सोशल मीडियावर हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. महिलेसोबत झालेल्या या घटनेमुळे त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. मिडिया रिपोर्टनुसार, बंगळुरु पोलिस या संपूर्ण घटनेची चौकशी करत आहेत.

Rapido Viral Video
Rohit Sharma Reaction: रोहितला आठवला 19 नोव्हेंबर? महिलांनी वर्ल्डकप जिंकताच स्टँडमध्ये बसलेला हिटमॅन भावूक; रिएक्शन होतेय Viral

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com