Crime News : पोलिसांचा धाक उरला नाही? छठ पूजेदरम्यान दोन गटात तुंबळ हाणामारी, नेमकं काय घडलं? video viral

Kalyan Crime News : कल्याणमध्ये छठ पूजेदरम्यान दोन गटात फटाक्यांवरून वाद झाला. हा वाद काही क्षणांतच तुफान हाणामारीत बदलला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणत आरोपींचा शोध सुरू केला आहे.
 Crime News : पोलिसांचा धाक उरला नाही? छठ पूजेदरम्यान दोन गटात तुंबळ हाणामारी, नेमकं काय घडलं? video viral
Kalyan NewsSaam Tv
Published On
Summary

कल्याणमध्ये फटाक्यांवरून दोन गटात वाद

छठ पूजेदरम्यान किरकोळ वादातून तुफान हाणामारी

घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत नियंत्रण मिळवले

संघर्ष गांगुर्डे, कल्याण डोंबिवली

कल्याण डोंबिवलीत दिवाळी सणामध्ये अनेक गुन्हेगारीच्या घटना घडल्या. या गुन्हेगारीला वेळीच आळा घालण्यासाठी पोलिसांनी मध्यरात्री मार्च काढला. शिवाय टवाळखोरांना कारवाईचा सक्त इशारा दिला. पोलिसांनी दाखवलेल्या खाकी बडग्यानंतरही कल्याणमध्ये दोन गटात फटाके लावण्याच्या किरकोळ वादातून तुफान हाणामारी झाल्याचं पाहायला मिळालं. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण परिसरात छठ पूजेदरम्यान दोन्ही गटातील तरुणांमध्ये फटाके लावण्यावरून किरकोळ वाद झाला. या वादात शब्दाला शब्द वाढत गेला. हमरीतुमरीचा हा वाद काही क्षणांतच इतका उग्र झाला की दोन्ही गटांनी एकमेकांच्या अंगावर धावून जात हाणामारी केली. उपस्थित नागरिकांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यात त्यांना यश आले नाही.

 Crime News : पोलिसांचा धाक उरला नाही? छठ पूजेदरम्यान दोन गटात तुंबळ हाणामारी, नेमकं काय घडलं? video viral
Shocking News : कंपनी मॅनेजरची कर्मचारी महिलेवर वाईट नजर, बलात्कार करून खंडणी उकळली, बायकोचीही नवऱ्याला साथ

आजूबाजूच्या नागरिकांनी यासंदर्भांत पोलिसांना पाचारण केले. घटनेची माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. सध्या पोलिसांनी व्हिडिओच्या आधारे हाणामारीत सहभागी असलेल्या तरुणांचा शोध सुरू केला आहे. या घटनेमुळे उत्सवाच्या वातावरणात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

 Crime News : पोलिसांचा धाक उरला नाही? छठ पूजेदरम्यान दोन गटात तुंबळ हाणामारी, नेमकं काय घडलं? video viral
Maharashtra Cyclone Alert : महाराष्ट्रावर दुहेरी चक्रीवादळाचं सावट! पुढील काही तास धोक्याचे, वाचा IMD ने काय इशारा दिला?

या घटनेप्रकरणी पोलिसांनी नागरिकांना सण-उत्सव शांततेत साजरे करण्याचे आवाहन केले असून, वाद निर्माण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असेही स्पष्ट केले आहे. दरम्यान नागरिकांनी या घटनेनंतर सुरक्षितेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. या घटनेतील तरुणांना अद्दल घडेल का ? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com