Ranya Rao : कानफटात मारल्या, उपाशी ठेवलं...; सोनं तस्करीत अटकेत असलेल्या अभिनेत्रीचे गंभीर आरोप

Ranya Rao Gold Smuggling News : सोनं तस्करीत कोठडीत असलेली अभिनेत्री रान्या राव हिनं अनेक गंभीर आरोप केले आहेत. मला खोट्या प्रकरणात गोवलं असून, मी निर्दोष आहे, असा दावा तिनं केला आहे.
Ranya Rao Gold Smuggling Case
Ranya Rao Gold Smuggling Casesaam tv
Published On

१४ किलो सोन्याच्या तस्करीच्या आरोपांखाली अटकेत असलेली कन्नड अभिनेत्री रान्या राव हिनं धक्कादायक आरोप केले आहेत. रान्या राव सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. डीआरआयच्या कोठडीत असताना उपाशी ठेवल्याचा आणि कानशिलात लगावल्याचा आरोप तिनं संबंधित तपास यंत्रणेतील अधिकाऱ्यांवर केले आहेत. तसेच मला कोऱ्या कागदावर सह्या करण्यास भाग पाडलं, असंही तिनं म्हटलं आहे. मला खोट्या प्रकरणात गोवलं असून, मी निर्दोष आहे, असा दावाही राव हिनं केला आहे.

काय आहे प्रकरण?

बेंगळुरूच्या केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर ३ मार्च रोजी रान्या राव हिला १४.२ किलो सोनं तस्करी प्रकरणात अटक करण्यात आली होती. यानंतर रान्या राव हिचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यात तिचे डोळे सूजलेले होते. तर तिच्या चेहऱ्यावर जखमांचे व्रण दिसून येत होते. कोठडीत तिला मारहाण झाली की काय, अशा चर्चा सुरू झाल्या होत्या.

महिला आयोगानं घेतली दखल

कर्नाटक राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा नागलक्ष्मी चौधरी यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली. जोपर्यंत कोणतीही तक्रार प्राप्त होत नाही, तोपर्यंत आयोगाला कोणतीच कारवाई करता येणार नसल्याचे चौधरी यांनी स्पष्ट केले होते. ज्यांनी कुणी मारहाण केली आहे, तसं करणं योग्य नाही. कुणीही अशा प्रकारे कायदा हातात घेता कामा नये. आधी चौकशी झाली पाहिजे. त्यानंतर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, असेही त्या म्हणाल्या होत्या.

Ranya Rao Gold Smuggling Case
Thane News : पुष्पा स्टाईलने दारूची तस्करी; सिमेंट मिक्सरमधून बनावट दारूचा साठा जप्त

जामीन अर्जही फेटाळला

मी निर्दोष आहे, मला खोट्या प्रकरणात अडकवलं जात आहे, असा दावा रान्या रावनं डीआरआयच्या कोठडीत चौकशीदरम्यान केला होता. मला झोपही लागत नाही आणि मानसिकदृष्ट्या खूपच त्रासलेली आहे, असंही तिनं सांगितलं होतं. सध्या रान्या राव ही न्यायालयीन कोठडीत आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. विशेष न्यायालयानं शुक्रवारी राव हिने केलेला जामीन अर्जही फेटाळला होता.

Ranya Rao Gold Smuggling Case
Ranya Rao Arrested : सोन्याची तस्करी; आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रसिद्धी अभिनेत्रीला अटक, १४ किलो सोनं जप्त

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com