Thane News : पुष्पा स्टाईलने दारूची तस्करी; सिमेंट मिक्सरमधून बनावट दारूचा साठा जप्त

Thane : मिक्सरमध्ये लपवून ठेवलेले गोवा राज्यातील बनावट विदेशी मद्याचे ५९५ बॉक्स आढळून आले. ज्याची साधारण किंमत ६६ लाख ३९ हजार इतकी आहे दारूच्या बॉक्ससह सिमेंट मिक्सर ट्रक देखील जप्त
Thane News
Thane NewsSaam tv
Published On

ठाणे : गोवा राज्यात बनावट दारू निर्माण करून विक्रीसाठी राज्यात आणली जात होती. यासाठी चक्क सिमेंट मिक्सरचा वापर करण्यात आला होता. ठाण्यात पुष्पा स्टाईलने करण्यात येणारे दारूची तस्करी उघडकीस आणली असून एका सिमेंट मिक्सरसह ६६ लाख ३९ हजाराचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. सदरची कारवाई ठाणे राज्य उत्पादन शुल्क विभागाचा भरारी पथकाने केली आहे.

ठाणे उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाला गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार परराज्यातील मद्याची वाहतूक होणार असल्याचे समजले. त्यानुसार सीबीडी - डी. वाय. पाटीलकडे जाणाऱ्या रस्त्यावर घाटामध्ये दारूबंदी करण्यासाठी गस्त घालत असताना पांढऱ्या रंगाचा दहाचाकी सिमेंट मिक्सर या वाहनावर संशय आला. सदर वाहनास थांबवुन तपासणी केली असता वरती काहीच आढळून आले नाही. 

Thane News
Gas Cylinder Blast : गॅस गळती होऊन सिलेंडरचा स्फोट; एकाचा उपचारादरम्यान मृत्यू

६६ लाख रुपयांची दारू जप्त 

मात्र वाहनाच्या मधील बाजूस असलेल्या सिमेंट मिक्सरचे झाकण उघडून आतमध्ये तपासणी केली असता यामध्ये दारूचे बॉक्स आढळून आले. मिक्सरमध्ये लपवून ठेवलेले गोवा राज्यातील बनावट विदेशी मद्याचे ५९५ बॉक्स आढळून आले. ज्याची साधारण किंमत  ६६ लाख ३९ हजार इतकी आहे. पथकाने दारूच्या बॉक्ससह सिमेंट मिक्सर ट्रक देखील जप्त केला आहे. 

Thane News
Bird Flu : बर्ड फ्ल्यूचा पुन्हा शिरकाव; धाराशिवमध्ये कावळ्यांचा मृत्यू

ट्रक चालकाला अटक  

ठाणे उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने आज गस्त सुरू असतानाच नवी मुंबईमधील बेलापूर या ठिकाणी सापळा रचून सदर कारवाई केली आहे. या प्रकरणी मिक्सर चालक मोहन जोशी याला अटक करत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कारवाई राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक एम. पी. धनशेट्टी, दुय्यम निरीक्षक एन. आर. महाले, दुय्यम निरीक्षक एस. आर. मिसाळ, सहाय्यक दुय्यम निरीक्षक बी.जी. थोरात आदींनी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com