Bird Flu : बर्ड फ्ल्यूचा पुन्हा शिरकाव; धाराशिवमध्ये कावळ्यांचा मृत्यू

Dharashiv News : काही दिवसांपूर्वी मृत कावळे आढळून आले होते. या कावळ्यांचे नमुने तपासणीसाठी भोपाळ येथे पाठविण्यात आले होते. दरम्यान याचा अहवाल प्राप्त झाला असून मृत कावळ्यांना बर्ड फ्लूची लागण
Bird Flu
Bird FluSaam tv
Published On

बालाजी सुरवसे 

धाराशिव : मागील दोन महिन्यांपूर्वी बर्ड फ्ल्यूने राज्यात शिरकाव केला होता. यामुळे राज्यातील अनेक भागात कोंबड्याना लागण झाल्याचे समोर आले होते. यात कोंबड्यांचा मृत्यू झाला होता. मात्र मागील काही दिवसात प्रमाण कमी झाल्यानंतर पुन्हा एकदा बर्ड फ्ल्यूने डोके वर काढले आहे. यात धाराशिवमध्ये कवड्यांच्या मृत्यू झाला असून हा मृत्यू बर्ड फ्ल्यूनेच झाल्याचे समोर आले आहे. यामुळे खळबळ उडाली आहे. 

धाराशिव जिल्ह्यातील ढोकी परिसरात काही दिवसांपूर्वी मृत कावळे आढळून आले होते. या कावळ्यांचे नमुने तपासणीसाठी भोपाळ येथे पाठविण्यात आले होते. दरम्यान याचा अहवाल प्राप्त झाला असून मृत कावळ्यांना बर्ड फ्लूची लागण झाल्याचे अहवाल म्हटले आहे. सदरचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पशुसंवर्धन विभाग अलर्ट झाला असून गावातील कोंबड्या किंवा पक्षांना लागण तर झालेली नाही; याची तपासणी सुरु करण्यात आली आहे. यासाठी टीम कार्यरत आहे. 

Bird Flu
Onion Price : कांदा दरात ८०० रुपयांची घसरण; आवक वाढल्याचा परिणाम

दोन महिन्यापूर्वी अनेक जिल्ह्यात प्रसार 

दोन- अडीच महिन्यांपूर्वी राज्यातील अनेक भागात बर्ड फ्ल्यूचा शिरकाव झाला होता. प्रामुख्याने नंदुरबार, सांगली, लातूर, उदगीर या भागांमध्ये बर्ड फ्ल्यू अधिक प्रमाणात वाढला होता. पोल्ट्री फार्ममधील कोंबड्याचा यामुळे मृत्यू झाला होता. याचा अधिक धोका वाढू नये यासाठी काही ठिकाणी कोंबड्या व अंडी नष्ट करण्यात आली होती. यामुळे बर्ड फ्ल्यूचा प्रसार थांबला होता. यानंतर पुन्हा एकदा कवड्यांमध्ये बर्ड फ्ल्यूची लागण झाल्याचे समोर आले. 

Bird Flu
Gas Cylinder Blast : गॅस गळती होऊन सिलेंडरचा स्फोट; एकाचा उपचारादरम्यान मृत्यू

ग्रामपंचायतीकडून निर्जंतुकीकरण 
धाराशिव जिल्ह्यातील ढोकी या गावात आढळून आलेले मृत कावळ्यांचे नमुने भोपाळ येथील प्रयोगशाळेला पाठवण्यात आलेले तपासणी नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. यामुळे ढोकी परिसरात पशुसंवर्धन विभाग आणि ग्रामपंचायत कडून संपूर्ण गावात निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे. तसेच मृत कावळे ज्या परिसरात आढळले त्या परिसरात ये जा करू नये; असे आवाहन पशुसंवर्धन विभाग आणि ढोकी ग्रामपंचायतकडून करण्यात आले आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com