Ramdas Athwale : महायुतीत मुख्यमंत्रिपदाबाबत काय चर्चा झाली? रामदास आठवले यांनी सांगितली Inside Story

Ramdas Athwale News : रामदास आठवले यांनी महायुतीच्या पेचावर भाष्य केलं. मुख्यमंत्री कोण झालं पाहिजे, यावरही आठवले यांनी भाष्य केलं.
महायुतीत मुख्यमंत्रिपदाबाबत काय चर्चा झाली? रामदास आठवले यांनी सांगितली Inside Story
Ramdas Athwale :Saam tv
Published On

नवी दिल्ली : विधानसभा निकालानंतर महायुतीत मुख्यमंत्री कोण होणार, याकडे साऱ्यांचे लक्ष लागलं आहे. एकीकडे भाजपने मुख्यमंत्रिपदावर दावा केला आहे. तर शिंदे गटही मुख्यमंत्रिपदावर ठाम आहेत. त्यामुळे महायुतीत बैठकांचा सपाटा सुरु आहे. एकीकडे शिंदे गटातील नेत्याने भाजपने मुख्यमंत्रिपद देणार असल्याचा शब्द दिल्याचा दावा केला आहे. त्यानंतर एका नव्या चर्चेला सुरुवात झाली आहे. मात्र, महायुतीतील घटकपक्ष आरपीआय आठवले गटाचे प्रमुख रामदास आठवले यांनी भाजपने कोणताच शब्द नसल्याचं म्हटलं आहे.

केंद्रीय गृहमंत्री रामदास आठवले हे दिल्लीत आहेत. यावेळी केंद्रीय गृहमंत्री रामदास आठवले यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत रामदास आठवले यांनी मुख्यमंत्रिपदावर पेचावर भाष्य केलं. रामदास आठवले म्हणाले, 'एकनाथ शिंदे यांनी अडीच वर्षात चांगल काम केलं. महायुतीच्या सरकारने अनेक चांगले निर्णय घेतले. या विजयात एकनाथ शिंदे यांचा मोठा वाटा आहे. कालची निवडणूक विकासाच्या मुद्यावर झाली. यावेळी संविधानाचा मुद्दा निवडणुकीत चालला नाही. एवढ्या जागा आमच्या येतील, असा आमचा विश्वास होता. मात्र, खात्री नव्हती'.

महायुतीत मुख्यमंत्रिपदाबाबत काय चर्चा झाली? रामदास आठवले यांनी सांगितली Inside Story
Maharashtra Assembly Result: लाडक्या बहिणींमुळे सरकार आलं खरं, पण विधानसभेतील महिला आमदारांची संख्या घटली

'भाजपला वाटत आहे की, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले पाहिजेत. माझं मत असं आहे की, जास्त जागा असल्याने भाजपचा मुख्यमंत्री झाला पाहिजे. एकनाथ शिंदे यांच्याबाबत आम्हाला आदर आहे. यातून मार्ग काढण्यासाठी त्यांना केंद्रात मंत्री केलं, तर फायदा होईल. यातून काहीतरी मार्ग निघेल. हा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना घ्यायचा आहे, असे ते पुढे म्हणाले.

महायुतीत मुख्यमंत्रिपदाबाबत काय चर्चा झाली? रामदास आठवले यांनी सांगितली Inside Story
Nitish Kumar : महिला आहेस, तुला काय कळतं, कुठून कुठून येतात! नितीश कुमारांची विधानसभेत पुन्हा जीभ घसरली, पाहा Video

'माझ्या पक्षाला एक आमदारकी आणि एक मंत्रिपद मिळालं पाहिजे. पुढीच्या २-३ दिवसात निर्णय होईल, असं मला वाटतं. बिहारमध्ये आधीच नितीश कुमार यांना शब्द दिला होता. त्यामुळं त्यांना मुख्यमंत्री केलं पाहिजे. एकनाथ शिंदे यांना असा काही शब्द दिला होता, अस मला वाटत नाही. त्यामुळं मुख्यमंत्री भाजपचा होईल असं वाटतं, असे ते पुढे म्हणाले.

महायुतीत मुख्यमंत्रिपदाबाबत काय चर्चा झाली? रामदास आठवले यांनी सांगितली Inside Story
Mahayuti News : महायुतीत मुख्यमंत्री ठरला? देवेंद्र फडणवीसांच मोठं विधान, पाहा Video

ईव्हीएमवर भाष्य करताना आठवले म्हणाले, 'बॅलेट पेपरवर निवडनिवडणूक घेतल्याने मतमोजणीला खूप वेळ लागायचा. जर मतांची बेरीज होत नसेल तर निवडणूक आयोगाने याची दखल घ्यावी. अशा घटना ज्या ठिकाणी घडल्या आहेत. त्याची निवडणूक आयोगाने दखल घ्यावी'.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com