Accident: भरधाव डंपरची दुचाकीसह १७ वाहनांना धडक; १९ जणांचा मृत्यू, अपघाताचा थरारक सीसीटीव्ही VIDEO

Jaipur Accident CCTV Video: जयपूरमध्ये भरधाव डंपरने १७ वाहनांना धडक दिली. या अपघातामध्ये १७ जणांचा मृत्यू तर अनेक जण गंभीर जखमी झाले. हा अपघात सीसीटीव्हीत कैद झाला आहे. अपघाताचा थरकाप उडवणारा व्हिडीओ समोर आला आहे.
Accident: भरधाव डंपरची दुचाकीसह १७ वाहनांना धडक; १९ जणांचा मृत्यू, अपघाताचा थरारक सीसीटीव्ही VIDEO
Jaipur Accident CCTV VideoSaam Tv
Published On

Summary -

  • जयपूरमधील लोहा मंडी रोड क्रमांक १४ वर भीषण अपघात

  • मद्यधुंद चालकाने भरधाव वेगात डंपर चालवत १७ वाहनांना धडक दिली

  • या अपघातात १९ जणांचा मृत्यू झाला तर १२ पेक्षा अधिक जखमी

  • अपघाताचा थरकाप उडवणारा सीसीटीव्ही व्हिडीओ व्हायरल

जयपूरमध्ये सोमवारी दुपारी भीषण अपघाताची घटना घडली. मद्यधुंद चालकाने भरधाव वेगात डंपर चालवत आधी दुचाकीला धडक दिली त्यानंतर त्याने रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांसह अनेक वाहनांना धडक दिली. या अपघाताचा थरकाप उडवणारा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये डंपर नियंत्रणाबाहेर जात असल्याचे आणि इतर वाहनांना धडक देत असल्याचे दिसून येत आहे. हा अपघात इकता भीषण होता की डंपरखाली अनेकांचे मृतदेह अडकले होते. या अपघातामध्ये आतापर्यंत १९ जणांचा मृत्यू झाला.

Accident: भरधाव डंपरची दुचाकीसह १७ वाहनांना धडक; १९ जणांचा मृत्यू, अपघाताचा थरारक सीसीटीव्ही VIDEO
Accident : खडीने भरलेल्या ट्रकची प्रवासी बसला जोरात धडक, २० जणांचा जागेवरच मृत्यू, अनेकजण जखमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जयपूरमध्ये अनेक वाहनांना धडक देत रस्त्यावरून जाणाऱ्या अनेक नागरिकांना चिरडले. या अपघातामध्ये १९ जणांचा मृत्यू झाला. या अपघातामध्ये १२ पेक्षा अधिक जण गंभीर जखमी झाले. या अपघातामध्ये जखमी झालेल्यांवर कानवटिया रुग्णालय आणि ट्रॉमा सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. जखमींमधील अनेकांची प्रकृती चिंताजनक आहे. भरधाव डंपरने ज्या वाहनांना धडक दिली त्यांचा अक्षरश: चुराडा झाला आहे. काही दुचाकी डंपरखाली अडकल्या होत्या.

या अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. अपघातामध्ये मृत्यू आणि जखमी झालेल्यांच्या कुटुंबियांनी ट्रॉमा सेंटरबाहेर मोठी गर्दी केली. रुग्णालयाबाहेर नातेवाईकांनी आक्रोश केला.

अपघाताची तीव्रता लक्षात घेता मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी कॅबिनेट मंत्री सुमित गोदरा आणि सुरेश सिंग रावत यांना रुग्णालयात पाठवले. त्यांनी जखमींना सर्वोत्तम उपचार देण्याच्या सूचना डॉक्टरांना दिल्या. ट्रॉमा सेंटरचे नोडल अधिकारी बीएल यादव यांनी सांगितले की, सर्व जखमींवर उपचार सुरू आहेत आणि काहींना पुढील उपचारासाठी कानवटिया रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

Accident: भरधाव डंपरची दुचाकीसह १७ वाहनांना धडक; १९ जणांचा मृत्यू, अपघाताचा थरारक सीसीटीव्ही VIDEO
Accident: महामार्गावर अपघाताचा थरार! भरधाव डंपरची १० वाहनांना धडक, १३ जणांचा जागीच मृत्यू; थरकाप उडवणारा VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com