Bus Accident: प्रवाशांनी भरलेली बस पुलावरून खाली कोसळली; ४ जणांचा जागीच मृत्यू, अनेक जखमी, थरारक VIDEO

Rajasthan Bus Accident: चालकाचे नियंत्रण सुटल्याने प्रवाशांनी खचाखच भरलेली बस पुलावरुन रेल्वे ट्रॅकवर कोसळली. या भीषण अपघातात ४ प्रवाशांचा मृत्यू झाला. तर ४० हून अधिक प्रवासी जखमी झाले.
Rajasthan News Horrible bus accident in Dausa 4 passengers killed, many injured
Rajasthan News Horrible bus accident in Dausa 4 passengers killed, many injuredSaam TV
Published On

Rajasthan Dausa Bus Accident

चालकाचे नियंत्रण सुटल्याने प्रवाशांनी खचाखच भरलेली बस पुलावरुन रेल्वे ट्रॅकवर कोसळली. या भीषण अपघातात ४ प्रवाशांचा मृत्यू झाला. तर ४० हून अधिक प्रवासी जखमी झाले. मृतांमध्ये दोन महिला आणि दोन पुरुषांचा समावेश आहे. थरकाप उडवणारी ही घटना राजस्थानमधील दौसा जिल्ह्यात सोमवारी पहाटेच्या सुमारास घडली. या घटनेनं हळहळ व्यक्त होत आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Rajasthan News Horrible bus accident in Dausa 4 passengers killed, many injured
Maratha Reservation: आम्हाला कुणबी प्रमाणपत्र नको, मराठा म्हणूनच आरक्षण द्या; महिलांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांसह पोलिसांनी (Police) घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पोलिसांनी ४ प्रवाशांचे मृतदेह ताब्यात घेऊन घटनेची चौकशी सुरू केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त बस (Bus Accident) हरिद्वार येथून जयपूरच्या दिशेने जात होती. या बसमधून साधारण ३० ते ३५ प्रवासी प्रवास करीत होते. दरम्यान, बस दौसा येथील राष्ट्रीय महामार्ग-२१ वरील पुलावर आली असता, चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटलं आणि बस थेट कठडा तोडून पुलाच्या खाली कोसळली.

या भीषण अपघातात आतापर्यंत ४ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर २४ हून अधिक प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. जखमींमध्ये काहींची प्रकृती चिंताजनक आहे. अपघाताची माहिती रेल्वे नियंत्रण कक्षाला मिळताच जयपूर-दिल्ली रेल्वे मार्गावरील अप आणि डाऊन मार्गावरील गाड्यांची वाहतूक तात्काळ थांबवण्यात आली. रेल्वे अधिकारीही घटनास्थळी पोहोचले.

बसमधील जखमी प्रवाशांना तातडीने बाहेर काढण्यात आलं. पोलिसांनी ४ प्रवाशांचे मृतदेह ताब्यात घेतले आहेत. रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या असलेल्या ५ प्रवाशांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना जयपूरला रेफर करण्यात आले आहे. मदत आणि बचावकार्य पूर्ण झाल्यानंतर आणि जखमींवर उपचार केल्यानंतर अपघाताचा तपास सुरू होईल, असे पोलिस-प्रशासनाचे म्हणणे आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com