Car Accident: देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांवर काळाची झडप; कार अपघातात एकाच कुटुंबातील ६ जणांचा मृत्यू

Rajasthan Accident: देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या कारला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. या घटनेत एकाच कुटुंबातील ६ जणांचा जागीच मृत्यू झाला.
Rajasthan Car Accident
Rajasthan Car AccidentSaam TV

Rajasthan Car Accident:

दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्गावर रविवारी पहाटेच्या सुमारास भीषण अपघाताची घटना घडली. देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या कारला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. या घटनेत एकाच कुटुंबातील ६ जणांचा जागीच मृत्यू झाला. तर दोघे जखमी झाले आहेत.

Rajasthan Car Accident
Samruddhi Mahamarg: समृद्धी महामार्गावर अज्ञात वाहनाची कारला धडक, भीषण अपघातात तिघांचा मृत्यू, दोघे जखमी

मृतांमध्ये ३ महिला आणि ३ पुरुषांचा समावेश आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य केले. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत.

सध्या मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त व्यक्ती एकाच कुटुंबातील असून ते राजस्थानमधील सीकर येथून रणथंबोरला देवदर्शनासाठी निघाले होते. दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्गावरून ते कारने प्रवास करीत होते.

रविवारी पहाटे ७ वाजेच्या सुमारास कार सवाई माधोपूर परिसरातील बनास कल्व्हर्टजवळ आली. त्याचवेळी अज्ञात वाहनाने कारला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती, की कारचा अक्षरश: चक्काचूर झाला. या घटनेत कारमधून प्रवास करणाऱ्या ६ जणांचा जागीच मृत्यू झाला.

याशिवाय कारमधील दोन मुलेही गंभीर जखमी झाली. अपघाताची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. अथक प्रयत्नानंतर कारमध्ये अडकून पडलेले मृतदेह बाहेर काढण्यात आले. कारला कोणत्या वाहनाने धडक दिली हे अद्याप समोर आलेले नाही. पोलीस घटनेचा तपास करीत आहेत.

Rajasthan Car Accident
Buldhana Crime News: संतापजनक! दुचाकीस्वाराला धडक दिली, जखमीला उपचारासाठी नेतो सांगून दरीत फेकलं; आरोपीला अटक

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com