Rajasthan News : आधी सिलिंडरचा झाला स्फोट, नंतर घराला लागली आग; ३ चिमुरड्यांसह ५ जणांचा होरपळून मृत्यू

Rajasthan Fire News : राजस्थानची राजधानी जयपूरमध्ये एक ह्रदयद्रावक घटना घटली आहे. एका घराला लागलेल्या आगीत पाच जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. या या तीन लहान मुले आणि त्यांच्या पालाकांचा समावेश आहे.
Rajasthan News
Rajasthan NewsSaam Digital

Rajasthan News

राजस्थानची राजधानी जयपूरमध्ये एक ह्रदयद्रावक घटना घटली आहे. एका घराला लागलेल्या आगीत पाच जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. या या तीन लहान मुले आणि त्यांच्या पालाकांचा समावेश आहे. जयपूरमधील विश्वकर्मा येथील जैसल्या गावातील यादव मार्केटमधील ही घटना आहे. सिलिंडरचा स्फोट झाल्यामुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनीही या घटनेनंतर शोक व्यक्त केला आहे. जखमींवर योग्य उपचार करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. अपघाताची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. फॉरेन्सिक टीमनेही तपास सुरू केला आहे. मृत्युमुखी पडलेले सर्वजण बिहारचे रहिवासी असून ते जयपूरमधील एका घरात राहत होते.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

राज्याचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनीही अपघाताबद्दल शोक व्यक्त केला आहे.'विश्वकर्मा, जयपूरमध्ये भीषण आगीमुळे एकाच कुटुंबातील ५ जणांचा अकाली मृत्यू झाल्याची बातमी हृदयद्रावक आहे. दुर्घटनेतील जखमींना योग्य उपचार सुविधा देण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

Rajasthan News
Lok Sabha Election : 'विकसित भारत' मेसेजवर निवडणूक आयोग नाराज; केंद्र सरकारला बजावली नोटीस

अशीच एक घटना डिसेंबर २०२३ मध्ये राजस्थानच्या खैरथल तिजारा जिल्ह्यात घडली होती. त्यानंतर एक कुटुंब खोलीत हिटर लावून झोपलं होतं. त्यामुळे रजाईला आग लागली आणि वडील आणि मुलगीचा होरपळून मृत्यू झाला होता. दाम्पत्य आणि त्यांची 2 महिन्यांची मुलगी निशिका खोलीत हिटर लावून झोपले होते. बेडजवळ हीटर ठेवला होता. रात्री दीडच्या सुमारास रजईला आग लागली.

Rajasthan News
Shocking News: परदेशात जाण्यासाठी रचला तरूणीनं स्वत:च्या अपहरणाचा बनाव; वडिलांकडे मागितली ३० लाखांची खंडणी,'असं'फुटलं बिंग

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com