राजस्थानच्या नागौरमधील डेगानामधील बाजारात मोठा अपघात झालाय. एका जीप चालकाला हृदयविकाराचा झटका आला. हृदयविकाराचा झटका आल्याने जीप अनियंत्रित होत कारने रस्त्यावर जाणाऱ्या लोकांना चिरडल्याची घटना घडली. डेगानामध्ये मिरवणूक चालू होती. मिरवणुकीमागे एक जीप चालत होती, त्यावेळी कार चालकाला हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर कार नियंत्रणाबाहेर गेले आणि पायी चालणाऱ्या ५ लोकांना चिरडल्याचं सांगितलं जात आहे. (Latest News)
मिळालेल्या माहितीनुसार, जांगीड समाजाकडून विश्वकर्मा जयंतीनिमित्त मिरवणूक काढण्यात आली होती. त्यावेळी कारवा गलीजवळ मिरवणुकीमागे संथ गतीने कार चालत होती. कार चालकाचे नाव इशाक खान (६०) असून त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि गाडीवरील नियंत्रण सुटले. हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचे कारवरील नियंत्रम सुटले. त्यामुळे कार काही मीटर पुढे गेली आणि मिरवणुकीत सहभागी झालेल्या व्यक्तींना कारने धडक दिली.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
दैनिक भास्कर या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहिती नुसार, या अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव हरिराम (७८ ) मुलगा नारायण राम रा. अलटवा आणि देवकरण (६५) मुलगा प्रभुराम रा. पुंडलोटा हे गंभीर जखमी झालेत. दोघांना अजमेरला रेफर करण्यात आले. दरम्यान मेघाराम (६२) मुलगा प्रेमा राम रा. टंकीपुरा डेगाणा आणि शिवराज (२९) मुलगा धर्मीचंद रा. देगाणा यांना प्राथमिक उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे.
पोलिसांनी घटनास्थळ गाठून या प्रकरणाचा तपास सुरू केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे वाहन आणि वाहन चालक दोघेही यात्रेचा भाग होते. अशावेळी यात्रापुढे जात होती आणि हे वाहन मागून संथ गतीने जात होते. अचानक वाहनाने वेग पकडला त्यानंतर वाहन पुढे चालणाऱ्या लोकांना चिरडलं. चालकाला हृदयविकाराचा झटका आल्याने हा अपघात झालाय.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.