Railway News : प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! 'या' मार्गावरील १४ रेल्वे रद्द, जाणून घ्या कारण

Railway Cancelled News : राजनांदगाव–कळमना तिसऱ्या रेल्वे मार्गाच्या कामामुळे २४ ते ३१ जानेवारीदरम्यान एकूण १४ पॅसेंजर व मेमू गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. प्रवाशांनी प्रवासापूर्वी रेल्वे अपडेट तपासावे.
Railway News : प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! 'या' मार्गावरील १४ रेल्वे रद्द, जाणून घ्या कारण
Railway NewsSaam Tv
Published On
Summary
  • २४ ते ३१ जानेवारीदरम्यान १४ रेल्वे गाड्या रद्द

  • छत्तीसगडमधील तिसऱ्या रेल्वे मार्गाचे काम कारणीभूत

  • पॅसेंजर, मेमू व डेमू गाड्यांचा समावेश

  • भविष्यातील वाहतूक सुधारण्यासाठी प्रकल्प सुरू

  • प्रवाशांना प्रवासापूर्वी अपडेट तपासण्याचे आवाहन

भारतात दररोज लाखो प्रवासी रेल्वेने प्रवास करतात. कामानिमित्त, पर्यटनानिमित्त, किंवा अन्य काही कारणास्तव नागरिक रेल्वेने ये-जा करतात. मात्र तुम्ही २४ जानेवारी ते ३१ जानेवारी पर्यंत रेल्वेने प्रवास करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी. छत्तीसगढ़मध्ये राजनांदगाव ते कलमना दरम्यान तिसरी रेल्वे लाईन जोडण्याचे काम सुरू झाले असल्या कारणाने काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

छत्तीसगढ़मध्ये राजनांदगाव-कळमना विभागातील तिसऱ्या रेल्वे मार्गावर सुरू असलेल्या कामाचा थेट रेल्वे वाहतुकीवर परिणाम होणार आहे. या प्रकल्पामुळे २४ जानेवारी ते ३१ जानेवारी दरम्यान एकूण १४ गाड्या रद्द करण्यात येणार आहेत. यामध्ये स्थानिक प्रवासी, मेमू आणि डेमू रेल्वेचा समावेश आहे.

Railway News : प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! 'या' मार्गावरील १४ रेल्वे रद्द, जाणून घ्या कारण
Crime News : २ मुलांच्या आईचं दुसऱ्यासोबत सूत जुळलं, वैतागलेल्या नवऱ्यानं आयुष्य संपवलं, बीडमधील धक्कादायक प्रकरण

राजनांदगाव-नागपूर तिसऱ्या मार्गाच्या प्रकल्पाशी संबंधित कामासाठी तुमसर रोड यार्ड येथे नॉन-इंटरलॉकिंग काम केले जाणार आहे. या तांत्रिक कामामुळे, काही प्रवासी गाड्या रद्द केल्या जातील, काही वळवल्या जातील किंवा त्यांच्या वेळा बदलल्या जातील. रेल्वेचे म्हणणे आहे की काम वेगाने सुरू आहे, ज्यामुळे भविष्यात वाहतूक सुरळीत होईल.

Railway News : प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! 'या' मार्गावरील १४ रेल्वे रद्द, जाणून घ्या कारण
Accident News : महामार्गावर अपघाताचा थरार! नियंत्रण सुटल्याने कार डिव्हायडरला धडकली, तरुणीचा जागीच मृत्यू तर एक गंभीर

'या' रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या आहेत

  • तुमसर रोडवरून सुटणारी ५८८१७ तुमसर रोड-तिरोडी पॅसेंजर २४ ते ३१ जानेवारी २०२६ पर्यंत धावणार नाही.

  • तिरोडीहून सुटणारी ५८८१६ तिरोडी-तुमसर रोड पॅसेंजर २४ ते ३१ जानेवारी २०२६ पर्यंत धावणार नाही.

  • नेताजी सुभाषचंद्र बोस (इतवारी) जंक्शनवरून सुटणारी ५८८१५ नेताजी सुभाषचंद्र बोस (इतवारी) - तिरोडी पॅसेंजर २४ ते ३१ जानेवारी २०२६ पर्यंत धावणार नाही.

  • तिरोडीहून सुटणारी ५८८१८ तिरोडी-तुमसर रोड पॅसेंजर २४ ते ३१ जानेवारी २०२६ पर्यंत धावणार नाही.

  • 68715 बालाघाट-नेताजी सुभाषचंद्र बोस (इतवारी)-तिरोडी मेमू 24 ते 31 जानेवारी 2026 पर्यंत बालाघाट येथून धावणार नाही.

  • 68714 नेताजी सुभाषचंद्र बोस (इतवारी) – नेताजी सुभाषचंद्र बोस (इतवारी) येथून निघणारी बालाघाट मेमू 24 ते 31 जानेवारी 2026 पर्यंत धावणार नाही.

  • 28 ते 31 जानेवारी 2026 पर्यंत दुर्गहून सुटणारी 68741 दुर्ग-गोंदिया मेमू धावणार नाही.

  • 68743 गोंदिया-नेताजी सुभाषचंद्र बोस (इतवारी) मेमू 28 ते 31 जानेवारी 2026 दरम्यान गोंदियाहून निघणार नाही

  • 68744 नेताजी सुभाषचंद्र बोस (इतवारी) – नेताजी सुभाषचंद्र बोस (इतवारी) येथून निघणारी गोंदिया मेमू 28 ते 31 जानेवारी 2026 पर्यंत धावणार नाही.

  • 28 ते 31 जानेवारी 2026 पर्यंत गोंदियाहून सुटणारी 68742 गोंदिया-दुर्ग मेमू धावणार नाही.

  • डोंगरगढहून सुटणारी ६८७११ डोंगरगढ-गोंदिया मेमू ही गाडी २८ ते ३१ जानेवारी २०२६ पर्यंत धावणार नाही.

  • 68713 गोंदिया-नेताजी सुभाषचंद्र बोस (इतवारी) मेम 28 ते 31 जानेवारी 2026 पर्यंत गोंदियाहून निघणार नाही.

  • 68716 नेताजी सुभाषचंद्र बोस (इतवारी) – इतवारीहून निघणारी गोंदिया मेमू 28 ते 31 जानेवारी 2026 पर्यंत धावणार नाही.

  • 28 ते 31 जानेवारी 2026 या कालावधीत गोंदियाहून सुटणारी 68712 गोंदिया-डोंगरगड मेमू धावणार नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com