Rahul Gandhi Rides Tractor: राहुल गांधी थेट शेताच्या बांधावर, पहाटे शेतात केली भात लावणी; ट्रॅक्टरही चालवला

Rahul Gandhi News: राहुल गांधी यांनी आज सकाळी सकाळी हरियाणातील सोनीपत येथील एका गावात भात लावणी केली
Rahul Gandhi News
Rahul Gandhi NewsSaam tv
Published On

Rahul Gandhi News: काँग्रेस नेते राहुल गांधी हे गेल्या काही दिवसांपासून देशभरातील वेगवेगळ्या मजुरांसोबत काम करताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी राहुल गांधी यांनी दिल्लीत वाहने दुरुस्त करणाऱ्या दुकानात काम करण्याचा अनुभव घेतला. त्यानंतर राहुल गांधी आज थेट शेताच्या बांधावर दिसले. त्यांनी आज सकाळी सकाळी हरियाणातील सोनीपत येथील एका गावात भात लावणी केली. त्यासोबत गांधी यांनी ट्रॅक्टरही चालवला. (Latest Marathi News)

शेतात केली भात लावणी

राहुल गांधी हिमाचल प्रदेश येथे जाण्यासाठी निघाले होते. त्यावेळी त्यांना रस्त्यात सोनीपत येथील मदीना गावात भात लावणी सुरू होती. त्यावेळी अचानक राहुल गांधी हे भात लावणी करण्यासाठी शेतात पोहोचले.

Rahul Gandhi News
Balasore Train Accident Case: बालासोर ट्रेन अपघात प्रकरणात CBI ची मोठी कारवाई, 3 रेल्वे कर्मचाऱ्यांना अटक; नेमकं कारण काय?

राहुल गांधी यांनी यावेळी मजुरांसोबत शेतात लावणी केली, त्यासोबत शेतात ट्रॅक्टरही चालवला. यावेळी त्यांनी शेतात मजूर आणि शेतकऱ्यांशी संवाद साधला. राहुल गांधींना अचानक पाहून शेतातील सर्वच मजूर चकीत झाल्याचे पाहायला मिळालं.

काही दिवसांपूर्वी राहुल गांधी हे दिल्ली येथील करोल बाग येथील सायकलच्या बाजारात पोहोचले होते. त्यावेळी त्यांनी बाजारातील कामगार आणि व्यापाऱ्यांशी संवाद साधला होता. यावेळी गांधी यांनी गॅरेजवाल्यांशीही संवाद साधला. सायकलच्या बाजाराला भेट दिल्यानंतर राहुल गांधी यांनी काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते.

Rahul Gandhi News
Crime Story : ऑस्ट्रेलियात भारतीय विद्यार्थिनीची निर्घृण हत्या; एक्स बॉयफ्रेंडनं अपहरण करून ६५० किमी दूर नेलं, जिवंत पुरलं

दरम्यान, राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा ही भरपूर गाजली. यानंतर आता राहुल गांधी सामान्य लोकांशी थेट संवाद साधताना दिसत आहे. याआधी राहुल गांधी हे २३ मे रोजी दिल्ली ते चंडीगढचा प्रवास ट्रकने केला होता. यावेळी गांधी यांनी ट्रक चालकांशी संवादही साधला होता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com