

राहुल गांधींच्या आंदोलनानंतर पेलेट गन प्रकरणी गुन्हा दाखल
जंतर-मंतर विद्यार्थी आंदोलनादरम्यान पोलिसांनी पेलेट गनचा वापर केला होता
पेलेट गन हल्ल्यात जखमी साहिल लोचाब यांच्या तक्रारीनंतर गुन्हा
दिल्ली पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा केला दाखल
जंतर-मंतरवर करण्यात आलेल्या विद्यार्थी आंदोलनादरम्यान पोलिसांनी पेलेट गनचा वापर केला होता. याप्रकरणी अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी गुन्हा दाखल करावा यासाठी पोलिस ठाण्याबाहेर आज ठिय्या आंदोलन केले. या आंदोलनाला अखेर यश आले. दुपारपासून ते आंदोलनाला बसले होते. या आंदोलनानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला.
राहुल गांधी यांनी आज पोलिस ठाण्याला भेट देत तपास कुठवर आला, गुन्हा दाखल का केला जात नाही असा सवाल करत आंदोलन सुरू केले होते. राहुल गांधी यावेळी आपल्यासोबत पेलेन गन हल्ल्यात जखमी झालेल्या साहिल लोचाब याला देखील घेऊन गेले होते. ५ तासांपासून हे आंदोलन सुरू होते. या आंदोलनानंतर दिल्ली पोलिसांनी अखेर पीडित साहिल लोचाब यांच्या तक्रारीच्या आधारे पेलेट गन प्रकरणात गुन्हा दाखल केला आहे.
वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांने दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली पोलिसांनी २० जुलै रोजी जंतर मंतर येथे झालेल्या आंदोलनादरम्यान पेलेट गनच्या कथित वापरासंदर्भात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात कोणाचेही नाव घेण्यात आलेले नाही म्हणजेच अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याआधी राहुल गांधी यांनी पार्लमेंट स्ट्रीट पोलिस ठाण्यासमोर धरणे आंदोलन केले होते.
साहिल लोचाब या विद्यार्थ्यावर झालेल्या पेलेट गन हल्ल्याप्रकरणी जोपर्यंत गुन्हा दाखल होईपर्यंत आपण येथून जाणार नाही अशी आक्रमक भूमिका राहुल गांधी यांनी घेतली होती. राहुल गांधी यांच्यासोबत काँग्रेसचे कार्यकर्ते देखील उपस्थित होते. २० जुलै रोजी कनॉट प्लेसमध्ये विद्यार्थ्यांवर पेलेट गनचा वापर करण्यात आला होता आणि आपल्याकडे याचे ठोस पुरावे असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे एफआयआर दाखल करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.