

Political News : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधी पक्षांच्या आघाडीचे 'इंडिया' नावावरुन त्यांच्यावर निशाणा साधला आहे. ईस्ट इंडिया कंपनीमध्येही इंडिया आहे आणि इंडियन मुजाहिदीनमध्ये एक इंडियन आहे, असं पीएम मोदींनी म्हटलं होतं. नुसतं नाव ठेवलं म्हणून काय होते का? असा सवालही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थित केला होता.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या टीकेला आता राहुल गांधी यांनी प्रत्युत्तर दिले आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ट्वीट केले की, तुम्ही आम्हाला हवे ते म्हणू शकता, पण आम्ही इंडिया आहोत.
राहुल गांधींनी ट्वीट करत लिहिले की, तुम्ही आम्हाला काहीही बोला पण आम्ही इंडिया आहोत. आम्ही मणिपूरमधील स्थिती सुधारण्यास मदत करू आणि प्रत्येक स्त्री आणि मुलाचे अश्रू पुसू. आम्ही मणिपूरमध्ये भारताच्या विचाराची पुनर्बांधणी करू. आम्ही तेथील सर्व लोकांमध्ये प्रेम आणि शांतता परत आणू.
पंतप्रधान मोदींनी विरोधी पक्षांच्या 'इंडिया' आघाडीवर निशाणा साधला म्हटलं की, 'इंडिया' आघाडी ही देशातील आतापर्यंतची सर्वात दिशाहीन आघाडी आहे. ईस्ट इंडिया कंपनी आणि इंडियन मुजाहिदीन यांसारख्या नावांचा उल्लेख करून ते म्हणाले की, केवळ देशाच्या नावाचा वापर करून लोकांची दिशाभूल केली जाऊ शकत नाही. (Latest Marathi News)
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.