Rahul Gandhi : लोकसभेचा सामना सुरु होण्याआधी २ सहकाऱ्यांना तुरुंगात टाकलं; राहुल गांधींची भाजपवर टीका

Rahul Gandhi Speech In ramleela : 'खेळाडूला विकत घेऊन कर्णधाराला घाबरून मॅच फिक्सिंग सुरु आहे. लोकसभेचा सामना सुरु होण्याच्या आधी आमच्या दोन सहकाऱ्यांना तुरुंगात टाकलं, अशा शब्दात काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी यांनी भाजपवर जोरदार टीका केली.
Rahul gandhi
Rahul gandhiSaam tv

Rahul Gandhi Speech :

'खेळाडूला विकत घेऊन कर्णधाराला घाबरून मॅच फिक्सिंग सुरु आहे. लोकसभेचा सामना सुरु होण्याच्या आधी आमच्या दोन सहकाऱ्यांना तुरुंगात टाकलं. सर्व यंत्रणा खरेदी करून भाजप १८० पेक्षा पुढे जाणार नाही, अशा शब्दात काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी यांनी भाजपवर जोरदार टीका केली.

आज रविवारी राजधानी दिल्लीत विरोधकांनी पुन्हा एकदा शक्तीप्रदर्शन केलं. इंडिया आघाडीने रामलीला मैदानात आयोजित केलेल्या 'महारॅली'मधून विरोधी पक्षातील दिग्गज नेत्यांनी हजेरी लावली. या सभेला राहुल गांधींनी हजेरी लावली. या सभेतून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भाजपवर जोरदार टीका केली.

Rahul gandhi
Uddhav Thackeray: एक पक्ष देशासाठी खतरनाक..रामलीला मैदानावर उद्धव ठाकरे कडाडले; भाजपवर तोफ डागली!

राहुल गांधी यांच्या भाषणातील मुद्दे

लोकसभेच्या निवडणुकीत मॅच फिक्सिंग करण्याचा प्रयत्न होत आहे. भारतातील तीन ते चार अब्जाधीश लोक हे प्रयत्न करत आहेत. देशाला भविष्य दिलं. स्वप्न पाहण्याचा अधिकार दिला, ते संविधान बदलण्यासाठी ही मॅच फिक्सिंग सुरु आहे. ज्या दिवशी संविधान बदललं जाईल, तेव्हा हा देश संपून जाईल. संविधान देशाच्या लोकांचा आवाज आहे. संविधानाला संपवलं जाईल, तेव्हा देश नष्ट होऊन, राज्यांचे तुकडे होते.

हे विचार करत आहे की, ते माध्यमांशिवाय देश चालविण्याचा प्रयत्न करत आहे. देशातील लोकांचा आवाज कोणीही दाबू शकत नाही. भाजपच्या खासदारने म्हटलं की, निवडणूक जिंकल्यांवर आम्ही संविधानाला बदलू. हे विधान चाचपणी करण्यासाठी केलं. संविधान गेल्यावर लोकांचे अधिकार, आरक्षण निघून जाईल.

गरीबांची संपत्ती चार-पाच लोकांच्या हाती जाईल. नोटाबंदीचा कोणाला फायदा झाला. भारतात बेरोजगारी आहे. हे संविधानाला का बदलू इच्छित आहे , कारण यांना अधिकार हिसकावून घ्यायचे आहे. जर तुम्ही मतदान केलं नाही तर त्यांची मॅच फिक्सिंग यशस्वी होईल. गरीब, शेतकरी, मागासवर्गीय , अनुसूचित लोकांसाठी ही निवडणूक आहे. मॅच फिक्सिंग करण्यात येत आहे, हे सर्वांना दिसत आहे.

Rahul gandhi
PM Narendra Modi : कच्चाथीवू बेटाच्या मुद्द्यावरून PM मोदींचा काँग्रेसवर निशाणा

आमचं त्यांनी बँक खाते बंद केलं. त्यांनी ६ महिन्याआधी केलं असतं तर काही फरक पडला नसता. पण त्यांनी निवडणुकीच्या तोंडावर बँक खाते बंद केलं. भारतात, मॅच फिक्सिंगचा सामना भाजपने जिंकला तर, त्यानंतर संविधान बदललं जाईल, त्यानंतर देशाला आग लागेल. हा देश वाचणार नाही. लोकसभा निवडणूक ही देश आणि संविधानाला वाचविण्यासाठी आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com