Uddhav Thackeray: एक पक्ष देशासाठी खतरनाक..रामलीला मैदानावर उद्धव ठाकरे कडाडले; भाजपवर तोफ डागली!

INDIA Alliance Rally Ramlila Maidan: सभेमध्ये बोलताना शिवसेना ठाकरे गटप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अबकी बार; भाजप तडीपारचा नारा लगावत केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.
INDIA Alliance Rally Ramlila Maidan:
INDIA Alliance Rally Ramlila Maidan: Saamtv

Uddhav Thackeray Speech Delhi:

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेच्या विरोधात INDIA आघाडीतील घटक पक्ष दिल्लीमध्ये एकवटले आहेत. INDIA आघाडीच्या वतीने आज दिल्लीतील रामलीला मैदानावर विराट सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेमध्ये बोलताना शिवसेना ठाकरे गटप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अबकी बार; भाजप तडीपारचा नारा लगावत केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.

काय म्हणाले उद्धव ठाकरे?

"अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांना आत टाकले. मात्र सुनिता केजरीवाल उभ्या आहेत. कल्पना सोरेन इथे आहेत. तुम्ही हिंमत हारू नका सगळा देश तुमच्यासोबत आहे. ही हुकुमशाही चालणार नाही. देशाची जनता तुमच्या सोबत आहे. आम्ही घाबरणारे नाहीत; आम्ही लोकतंत्र वाचवण्यासाठी आलो आहोत.." अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकारवर तोफ डागली.

तसेच "भाजप कसा तपास यंत्रणांचा गैरवापर करत आहे हे पाहत आहोत. एक पक्ष, एक व्यक्ती देशासाठी खतरनाक आहे. आपल्याला यासाठी आघाडीचं सरकार आणावं लागणार आहे, असे म्हणत अबकी बार, भाजप तडीपार," असा नाराही उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी रामलीला मैदानावरुन दिला.

INDIA Alliance Rally Ramlila Maidan:
Success Story : बकऱ्या वळणाऱ्या रोहिणीची गगन भरारी; जपानी भाषेचं शिक्षण घेत मिळवली लाखोंची नोकरी

अखिलेश यादव यांचे टीकास्त्र

यावेळी बोलताना समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांनीही मोदी सरकारवर जोरदार टीका केली. "भाजपला सत्ता गमावण्याची चिंता वाटत आहे. ईडी, सीबीआय आणि आयकर विभागामार्फत देणग्या गोळा केल्या जातात. जगात भाजपपेक्षा कोणीही खोटे बोलले नाही. अरविंद केजरीवाल यांच्या अटकेनंतर भाजपवर जगभरातून टीका होत आहे," असे ते म्हणाले.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

INDIA Alliance Rally Ramlila Maidan:
Bharat Ratna 2024 : लालकृष्ण अडवाणी यांना राष्ट्रपती मुर्मू यांच्या हस्ते भारतरत्न प्रदान; पंतप्रधान मोदीही उपस्थित

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com