Election Commission: तुम्ही सही करा! राहुल गांधींच्या आरोपानंतर निवडणूक आयोगानं पाठवला कागद

Election Commission Send Affidavit To Rahul Gandhi: राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर मोठा आरोप केला आहे. आयोग भाजपशी संगनमत करून मतांची चोरी करत आहे. यावर निवडणूक आयोगानं राहुल गांधींना उत्तर दिलंय.
Rahul Gandhi
Election Commission Send Affidavit To Rahul Gandhisaam tv
Published On
Summary
  • राहुल गांधींनी कर्नाटक निवडणुकीत मतांची चोरी झाल्याचा गंभीर आरोप केला.

  • त्यांनी आरोप केला की, १ लाख मतदारांची नावे यादीतून हटवण्यात आली.

  • निवडणूक आयोगाने यावर उत्तर देत शपथपत्र पाठवलं.

  • आरोप खोटे आढळल्यास राहुल गांधींवर कायदेशीर कारवाई होणार.

मतदान प्रक्रियेवरून काँग्रेस खासदार आणि लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी निवडणूक आयोगावर सतत टीका करत असतात. राहुल गांधींनी महाराष्ट्र, हरियाणा आणि लोकसभा निवडणुकांमध्ये गैरप्रकार झाल्याचा आरोप केलाय. आता त्यांनी कर्नाटकच्या निवडणुकीवरून निवडणूक आयोगावर आता टीकास्त्र डागलंय. कर्नाटकात मतदार यादीतून एक लाख लोकांची नावे काढून टाकण्यात आली. त्यामुळे मते चोरीला गेली, असा आरोप राहुल गांधींनी केला होता. (Ec Sends Affidavit To Rahul Gandhi Over Vote Theft Allegations)

आता कर्नाटकच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी या प्रकरणी राहुल गांधींना एक प्रतिज्ञापत्र पाठवलंय. तुम्ही खरे आरोप करत आहात तर या शपथपत्रावर सही करा. जर त्याचे दावे खोटे असल्याचे आढळले तर तुमच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल, असं राहुल गांधींच्या आरोपावर उत्तर दिलंय.

Rahul Gandhi
Rahul Gandhi: कुठे मतदार वाढले, कुठे नावात चुकी; राहुल गांधींनी दाखवले एका मागोमाग मत चोरीचे पुरावे

पत्रकार परिषदेत राहुल गांधी यांनी केलेल्या आरोपावरून कर्नाटकच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांना एक पत्र पाठवले आहे. या पत्रात त्यांनी राहुल गांधींनी केलेल्या आरोपांचा उल्लेख केला आहे. राहुल गांधींनी या प्रतिज्ञापत्रावर स्वाक्षरी करावी, असं आयोगाच्या अधिकाऱ्याने सांगितलंय. कर्नाटकच्या सीईओंनी राहुल गांधींना लिहिलेल्या पत्रात, असे म्हटलं की, "आज झालेल्या पत्रकार परिषदेत तुम्ही अपात्र मतदारांचा समावेश आणि मतदार यादीत पात्र मतदारांना वगळण्याबद्दल उल्लेख केला होता".

Rahul Gandhi
'भारत कधीही तडजोड करणार नाही'; ट्रम्पच्या टॅरिफवर पंतप्रधान मोदींचं मोठं विधान

मतदार नोंदणी नियम, १९६० च्या नियम २०(३)(ब) अंतर्गत शपथेवर स्वाक्षरी करून ,ते वगळण्यात आलेल्या मतदारांच्या नावांसह ते परत पाठवावे अशी विनंती आहे. जेणेकरून आवश्यक ती कारवाई सुरू करता येईल." जर राहुल गांधी हे आरोप सिद्ध करू शकले नाहीत तर त्यांच्यावर निवडणूक आयोग कायदेशीर कारवाई करेल, असंही निवडणूक आयोगाच्या पत्रात सांगण्यात आले आहे. यापूर्वीही आयोगाने राहुल गांधी यांनी केलेले सर्व आरोप फेटाळून लावलेत.

आयोगाला राहुल गांधींचे उत्तर

राहुल गांधी यांच्या पत्रकार परिषदेदरम्यानच एका पत्रकाराने त्यांना निवडणूक आयोगाने पाठवलेल्या प्रतिज्ञापत्राची माहिती दिली. यावर उत्तर देताना काँग्रेस खासदार राहुल गांधी म्हणाले की, ते हे विधान सार्वजनिकरित्या करत आहेत. आयोगाने ते प्रतिज्ञापत्र म्हणूनच विचारात घ्यावे. "मी एक राजकारणी आहे.

'मी जे बोलत आहे ते सर्वांसमोर आहे. ते शपथ म्हणून पहावे. हा आमचा डेटा नाही. निवडणूक आयोग मी चुकीचा आहे असे का म्हणत नाही? ते मला प्रतिज्ञापत्रावर सही करण्यास सांगत आहेत. यावरून स्पष्ट होते की आम्हाला सर्व माहिती असल्याचं आयोगाला माहित आहे'., असं राहुल गांधी म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com