Ragging Case in Kerala: सरकारी कॉलेजमध्ये भयानक रॅगिंग; प्यायला लावलं थुंकीचं पाणी, अंगावरील कपडे उतरवले,नंतर तासभर...

Ragging Case in Kerala: केरळमधील एका सरकारी महाविद्यालयात काही सीनियर्स विद्यार्थ्यांनी प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्याला थुंकलेले पाणी प्यायला लावले.
Ragging Case in Kerala
Ragging Case in KeralaSaam tv
Published On

केरळमध्ये रॅगिंगचे एक भयानक प्रकरण समोर आले आहे. तिरुअनंतपुरममधील एका सरकारी महाविद्यालयात ७ सीनिअर विद्यार्थ्यांनी प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्याला तासभर मारहाण केली तसेच त्याला थुंकलेले पाणी पाजण्याचाही प्रयत्न केला. याप्रकरणी महाविद्यालयाच्या प्रशासनाने ७ वरिष्ठ विद्यार्थ्यांना कॉलेजमधून निलंबित केलंय.

तिरुअनंतपुरमच्या करियावट्टोम मधील एका सरकारी महाविद्यालयात रँगिंगची घटना घडलीय. या महाविद्यातील काही सीनियर्सकडून प्रथम वर्षांच्या विद्यार्थ्याची रँगिंग केल्याची घटना घडलीय. याप्रकरणी महाविद्यालयाच्या अँण्टी रॅँगिंग सेलने याचा रिपोर्ट तयार केलाय. त्याआधारे हे संपूर्ण प्रकरण पद्धतशीरपणे उघडकीस आले आहे. अहवालानंतरच या ७ सीनियर्स विद्यार्थ्यांना निलंबित करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. हे सातही विद्यार्थी केरळमधील सत्ताधारी पक्ष 'मास्कवादी कम्युनिस्ट पार्टी'च्या विद्यार्थी शाखा 'स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया' चे आहेत.

Ragging Case in Kerala
Viral News: 'आज आपल्या लग्नाची पहिली रात्र' तरूणानं फेसबुकवर फोटो केला शेअर; नेटकरी म्हणाले 'आता व्हिडिओ पाठवा'

करियावट्टोमच्या सरकारी महाविद्यालात ११ फेब्रुवारीला काही सीनियर्स आणि जुनियर्सदरम्यान वाद झाला होता. यात प्रथम वर्षातील एक विद्यार्थी जखमी झाला होता. त्याने सीनियर्स विद्यार्थ्यांविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली होती. पोलिसांकडे तक्रार केल्यामुळे सीनियर्स विद्यार्थ्यांना त्याचा राग आला. त्यांनी प्रथम वर्षाच्या तक्रारदार विद्यार्थ्याला शोधण्याचा प्रयत्न केला. पहिल्या वर्षातील विद्यार्थ्याच्या वसतिगृहात घुसून त्याचा शोध घेतला. परंतु तो सापडला नसल्याने त्यांनी दुसऱ्या विद्यार्थ्याला सोबत घेतले.

Ragging Case in Kerala
Metro Viral Video: मेट्रोमध्ये कपलचं रोमान्स, किस करताना पाहून बायका संतापल्या, चोप चोप चोपलं; VIDEO व्हायरल

या विद्यार्थ्याला SFI च्या एका खोलीत नेलं. तेथे त्याला मारहाण केली गेली अशी तक्रार या पीडित विद्यार्थ्याने दिलीय. पीडित विद्यार्थ्याने दिलेल्या माहितीनुसार, खोलीत नेल्यानंतर त्याला गुडघ्यावर बसवलं त्यानंतर त्याला मारहाण केली. सुमारे तासभर त्याला मारहाण करण्यात आली. जेव्हा त्याने पिण्यासाठी पाणी मागितले तेव्हा त्याला थुंकून पाणी देण्यात आल्याचे पीडित विद्यार्थ्याने सांगितले.

हे पाणी पिण्यास नकार दिल्याने त्याला आणखी मारहाण करण्यात आली. हे प्रकरण पोलिसांच्या हाती देण्यापूर्वी कॉलेजच्या अँण्टी रॅगिंग सेलने तक्रारीची कसून चौकशी केली. कॉलेज आणि हॉस्टेलमध्ये लावण्यात आलेले सीसीटीव्ही फुटेजही त्यांनी तपासले. रॅगिंगचे प्रकरण स्पष्ट दिसत असतानाच त्यांनी वरीष्ठ विद्यार्थ्यांना निलंबित करण्याची कारवाई केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com