Accident News : उड्डाण घेताच हेलिकॉप्टर समुद्रात कोसळलं, दुर्घटनेत ६ जणांचा मृत्यू

Qatar Helicopter News : कतारमध्ये समुद्रात हेलिकॉप्टर कोसळून ६ जणांचा मृत्यू झाला असून एक जण अद्याप बेपत्ता आहे. तांत्रिक बिघाडामुळे ही दुर्घटना घडल्याची शक्यता व्यक्त केली जात असून बचावकार्य सुरू आहे.
Accident News : उड्डाण घेताच हेलिकॉप्टर समुद्रात कोसळलं,  दुर्घटनेत ६ जणांचा मृत्यू
Qatar Helicopter Crash Accident Tragedy 6 DeadSaam Tv
Published On
Summary
  • कतारमध्ये हेलिकॉप्टर समुद्रात कोसळले

  • ६ जणांचा मृत्यू, १ जण बेपत्ता

  • तांत्रिक बिघाडामुळे अपघाताची शक्यता

  • बचाव आणि शोधमोहीम सुरू

  • मध्यपूर्वेतील तणावाच्या पार्श्वभूमीवर घटना

Qatar Helicopter Crash Accident Tragedy 6 Dead कतारमध्ये हेलिकॉप्टर कोसळून ६ जणांचा मृत्यू झाला आहे. आज दुपारी या हेलिकॉप्टरने नियमितपणे उड्डाण घेतलं होते. मात्र, त्यानंतर त्यात बिघाड झाला आणि ते थेट जमिनीवर येऊन कोसळले. या दुर्देवी घटनेनंतर ६ जणांचे मृतदेह सापडले असून तर एकाचा शोध सुरू आहे. या घटनेनंतर परिसरात तणाव निर्माण झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कतारमध्ये आज दुपारी एक हेलिकॉप्टर प्रवाशांना घेऊन रवाना झालं होत. त्यामध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने ते खाली समुद्रात कोसळलं. या दुर्घटनेत ६ जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले असून १ जण बेपत्ता आहे. कतारच्या संरक्षण मंत्रालयाच्या अहवालानुसार, हेलिकॉप्टर अपघातानंतर लगेचच त्यांची विशेष पथके देशाच्या सागरी हद्दीत शोध आणि बचाव कार्य करत आहेत.

Accident News : उड्डाण घेताच हेलिकॉप्टर समुद्रात कोसळलं,  दुर्घटनेत ६ जणांचा मृत्यू
Shocking : कॉलेजमध्ये मृत्यूचा तांडव! BSc च्या विद्यार्थ्याच्या छातीवर बसून ८ गोळ्या झाडल्या, वर्गाबाहेर रक्ताचा सडा

दरम्यान, मध्यपूर्वेत सुरू असलेल्या संघर्षाचा परिणाम कतारवरही दिसून येत आहे. इराणकडून अमेरिकन आणि इस्रायली हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून खाडी देशांवर हल्ले केले जात आहेत. त्यामुळे आधीच सुरू असलेला संघर्ष अधिक तीव्र झाला आहे. जागतिक स्थरावर ऊर्जा संकट निर्माण झालं आहे.एकीकडे आखाती देशांत युद्ध सुरु असताना दुसरीकडे झालेल्या अपघातामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. गृह मंत्रालयाने मृतांच्या कुटुंबीयांप्रती तीव्र दुःख व्यक्त करत संवेदना व्यक्त केल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com