Bus Accidnet : राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात! उड्डाणपुलाला धडक देऊन बस उलटली, ३ प्रवाशांचा मृत्यू, २५ हून अधिक जखमी

Punjab Bus Accidnet Update News : पंजाबमध्ये PRTC बसचा भीषण अपघात झाला. बस पुलाला धडकून शेतात उलटल्याने ३ प्रवाशांचा मृत्यू, तर २५ हून अधिक जण जखमी झाले. १० जणांची प्रकृती गंभीर असून पटियालामध्ये उपचार सुरू आहेत.
Punjab Bus Accident News
Punjab Bus Accident News AI Image
Published On: 
Summary
  • पंजाबमध्ये PRTCच्या बसचा बठिंडा-चंदीगड राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात झाला.

  • संगरूरहून चंदीगडकडे जाणारी बस उड्डाणपुलाजवळ पुलाला धडकून शेतात उलटली.

  • या दुर्घटनेत तीन प्रवाशांचा मृत्यू झाला असून २५ हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत.

पंजाबमध्ये PRTCच्या बसचा भीषण अपघात झाला आहे. या दुर्घटनेत तीन प्रवाशांचा मृत्यू झाला असून २५ हून अधिक जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी १० जणांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारांसाठी पटियाला येथील राजिंद्रा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी पीआरटीसीची बस संगरूर येथून प्रवाशांना घेऊन चंदीगडच्या दिशेने निघाली होती. प्रवासादरम्यान बठिंडा-चंदीगड राष्ट्रीय महामार्गावरील एका उड्डाणपुलाजवळ चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले. त्यानंतर बस थेट पुलाला धडकली आणि रस्त्याच्या बाजूला असलेल्या शेतात जाऊन उलटली. हा अपघात मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानापासून काही किलोमीटर अंतरावर घडल्याची माहिती आहे.

Punjab Bus Accident News
Married Life Tips : पती-पत्नीमध्ये किती वयाचे अंतर असावे? यशस्वी आणि सुखी संसाराचं गणित समजून घ्या

अपघात होताच बसमधील प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला. अनेक प्रवासी बसमध्ये अडकले होते, तर काही जण गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक नागरिक आणि पोलिसांच्या मदतीने बचावकार्य सुरू करण्यात आले. त्यानंतर जखमींना रुग्णवाहिकेतून संगरूर येथील सिव्हिल रुग्णालयात नेण्यात आले.

Punjab Bus Accident News
Accident News : महामार्गावर विचित्र अपघात! दाट धुक्यामुळे ५० वाहनं एकमेकांना धडकली; ११ जणांचा मृत्यू

रुग्णालयाचे एसएमओ डॉ. विनोद कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, तीन प्रवाशांचा रुग्णालयात आणण्यापूर्वीच मृत्यू झाला होता. तर, गंभीर जखमी असलेल्या १० प्रवाशांना १०८ रुग्णवाहिकेच्या मदतीने पटियाला येथील राजिंद्रा रुग्णालयात हलवण्यात आले. तर इतर ११ जखमींवर संगरूरच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. प्राथमिक माहितीनुसार, बस वेगात असल्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. दरम्यान, पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले असून अपघात नेमका कशामुळे झाला, याचा तपास सुरू केला आहे. या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.