'कुछ बडा होने वाला है'! मुख्यमंत्र्यांसह ९० आमदारांचा ताफा थेट राष्ट्रपतींच्या दरबारी, काय आहे कारण?

AAP MLA Meet President: पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना भेटण्यासाठी आम आदमी पक्षाच्या ९० आमदारांसह दिल्लीत दाखल झाले. यामुळे मोठ्या राजकीय घडामोडींची शक्यता वर्तवली जात आहे. सर्व आमदारांना घेऊन ते दिल्लीत का आलेत असा प्रश्न अनेकांना पडलाय.
AAP MLA Meet President:
Punjab CM Bhagwant Mann arrives in Delhi with AAP MLAs for a key meeting with President Droupadi Murmu amid political buzz.saam tv
Published On

पाच राज्यातील विधानसभा निवडणुकांचा निकाल लागला असून तेथे आता नवीन सरकार सत्तेत येणार आहे. सर्व ठिकाणी ऐतिहासिक निकाल लागले आहेत. याचदरम्यान पंजाब राज्यातील राजकारणात मोठी घडामोड होताना दिसत आहे. पंजाब सरकारमधील आमदार बंडाळी करणार असल्याची चर्चा असताना मुख्यमंत्र्यांनी ९० आमदारांच्या ताफ्यासह थेट दिल्ली गाठली आहे. दिल्लीत ते राष्ट्रपती दौपद्री मुर्मू यांची ते भेट घेणार आहेत. नेमकं काय प्रकरण हे जाणून घेऊ.

AAP MLA Meet President:
West Bengal New CM: बंगालच्या गादीवर कोण बसणार? मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीवर मोठी अपडेट, तारीख आणि CM चं नाव आलं समोर

दरम्यान भाजपमध्ये सामील झालेल्या राज्यसभा खासदारांना परत बोलावण्याची मागणी करण्यासाठी मुख्यमंत्री भगवंत मान यांनी आम आदमी पक्षाच्या (आप) ९० आमदारांसह दिल्लीत पोहोचलेत. त्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेणार आहेत. मुख्यमंत्री भगवंत मान यांचा ताफ्यात सुरक्षा रक्षक आणि आमदारांना घेऊन जाणाऱ्या तीन आलिशान बसेस आहेत. मान हे आमदारांसह आज पहाटे दिल्लीसाठी रवाना झाले. मुख्यमंत्री भगवंत मान हे राष्ट्रपतींची भेट का घेणार आहेत. पंजाबमध्ये काही उलथापालथ होणार आहे का? असे प्रश्न अनेकांना पडलेत. मुख्यमंत्र्यांचा दिल्ली दौरा हा राजकीय संकेत देणारा आणि पक्षातील एकता व शक्ती प्रदर्शन करणारा आहे.

AAP MLA Meet President:
Bihar Cabinet Expansion: राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार? 'सम्राट' सरकारमध्ये किती असणार मंत्री?

दिल्ली दरबारी आलेल्या आमदार आणि मंत्र्यांच्या हातात भारतीय जनता पक्षात सामील झालेल्या सात राज्यसभा खासदारांचे फोटोंचे फलक होते. त्या फोटोंवर “पंजाबचे गद्दार” असे लिहिले होते. पंजाब विधानसभेत आप'चे ९४ आमदार असून दिल्लीकडे कूच करण्याआधी सर्व आमदारांना मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी एकत्र येण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानंतर सकाळी ६ वाजता बसमध्ये बसण्याचे निर्देश देण्यात आले. सकाळी ५ वाजता मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी पोहोचण्यासाठी ते आपापल्या मतदारसंघातून पहाटे २ वाजल्यापासूनच निघालो होतो, असं एका आमदाराने सांगितले या दौऱ्याविषयी बोलताना सांगितलं.

दरम्यान सर्व आमदारांना दिल्लीत सोबत आणण्यामागे आपची एक मोठी रणनीती आहे. गेल्या महिन्यात सात राज्यसभा खासदारांनी भाजपमध्ये प्रवेश होता. यामुळे 'आप'मध्ये अंतर्गत वाद असून बंडाळी होण्याची शक्यता असल्याची चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर आमदारांसोबत दिल्ली आखण्यात आला. यामुळे पक्षांतर्गत मतभेद नाहीत हे दाखवण्याचा प्रयत्न आहे. यावेळी मुख्यमंत्री मान यांनी पंजाब विधानसभेने १ मे रोजी मंजूर केलेल्या विश्वासदर्शक ठरावाची प्रतही सोबत नेली आहे.

“संधीसाधू नेते” केवळ स्वतःच्या स्वार्थासाठी मनमानीपणे पक्ष बदलतात, जे पूर्णपणे चुकीचे असल्याचे मान म्हणालेत. सर्व आमदारांसोबत मु्ख्यमंत्र्यांनी प्रवास केल्यानं भाजपमध्ये गेलेल्या खासदरांना मेसेज दिला जातोय. आपमधील अनेक आमदार आपल्या संपर्कात असल्याचा दावा करणाऱ्या सात खासदारांनाही यातून एक संदेश जातोय असं एका आमदाराने सांगितलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com