Shocking : मोमोज खाऊन झोपले, सकाळी बेडवर आढळले मृतदेह; सख्ख्या बहीण-भावाचा मृत्यू, नेमकं झालं काय?

Punjab News : पंजाबमधील तरणतारन येथे धक्कादायक घटना घडली आहे. बाजारातून आणलेले मोमोज आणि चाप खाल्ल्यानंतर दोन लहान भावंडांचा संशयास्पद मृत्यू झाला. पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
Shocking : मोमोज खाऊन झोपले, सकाळी बेडवर आढळले मृतदेह; सख्ख्या बहीण-भावाचा मृत्यू, नेमकं झालं काय?
Punjab News Saam Tv
Published On
Summary
  • पंजाबमध्ये दोन लहान भावंडांचा संशयास्पद मृत्यू

  • बाजारातून आणलेले मोमोज आणि चाप खाल्ले

  • कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला

  • पोलिस तपास सुरू

उघड्यावरच बाहेरच अन्न खाऊ नका असं बऱ्याचदा डॉक्टरांमार्फत आवाहन करण्यात येत, मात्र अनेकदा डॉक्टरांच न ऐकता बाहेरच खाल्लं जात. त्यामुळे अनेक आजारांना सामोरं जावं लागत. अशीच एक घटना पंजाबमध्ये घडली आहे. मोमोज आणि चाप खाऊन दोन लहान भाऊ बहिणींचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. मुलांचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी तरन तारन रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. दरम्यान मुलांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. याप्रकरणी पोलीस तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, सदर घटना रविवारी सकाळी पंजाबमधील तरणतारन येथील तहसील बाजाराजवळील डीएसपी गलीमध्ये घडली आहे. शनिवारी रात्री संबंधित मुलांनी वडिलांकडे मोमोज आणि चाप आणण्याचा हट्ट धरला. त्यांच्या वडिलांनी त्यांना बाजारातून मोमोज आणि चाप आणून दिले.

Shocking : मोमोज खाऊन झोपले, सकाळी बेडवर आढळले मृतदेह; सख्ख्या बहीण-भावाचा मृत्यू, नेमकं झालं काय?
Central Railway : मध्य रेल्वेच्या RPF आणि GPF पथकाची मोठी कारवाई! १२.८२ लाख रुपये किमतीचे अमली पदार्थ जप्त; असा सापडला आरोपी जाळ्यात

मुलांनी ते खूप आवडीने खाल्ले, परंतु रात्रीच्या वेळी त्यांची तब्येत अचानक बिघडली. त्यांच्या शरीरावर लाल निळे डाग दिसू लागले. त्या रात्री दोन्ही मुलांनी त्यांच्या आईलाही चाप आणि मोमोज खायला दिले. मात्र त्यांना कोणताही त्रास झाला नाही.

Shocking : मोमोज खाऊन झोपले, सकाळी बेडवर आढळले मृतदेह; सख्ख्या बहीण-भावाचा मृत्यू, नेमकं झालं काय?
Kalyan : कल्याणमध्ये रक्ताने माखलेल्या कारचे रहस्य उलगडले, इंजिनीरिंगच्या विद्यार्थ्याने केली उबर चालकाची हत्या; धक्कादायक कारण समोर

सुमारे ९:३० वाजता, कुटुंब त्याच खोलीत झोपायला गेले. रविवारची सुट्टी असल्याने तिने मुलांच्या आईने त्यांना लवकर उठवले नाही. त्यानंतर ९:०० वाजता मुलांचे वडील त्यांना उठवण्याचा प्रयत्न करत होते, मात्र ते दोघेही उठले नाही. घाबरलेल्या पालकांनी रुग्णालयात धाव घेतली. मात्र तिथे जाण्यापूर्वी दोघांचाही मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी तपास सुरु केला असून नेमका कशामुळे मुलांचा मृत्यू झाला? हे पाहण्यासाठी दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com