Game Addiction: अरे बापरे! 15 वर्षीय मुलाला लागले PUBG सारख्या गेमचे वेड; झोपेतही ओरडतो 'फायर फायर', जेवणही सोडले

Game Addiction: १५ वर्षीय मुलगा झोपेतही फायर फायर ओरडतो, जणून गेमच खेळत आहे. सध्या एका दिव्यांग संस्थेच्या वसतिगृहात त्याचं समूपदेशन सुरू आहे.
Online Game
Online GameSaam tv
Published On

Rajasthan News: पबजी सारख्या अनेक गेमचं तरुणाईला वेड लागलं आहे. अनेक शाळकरी मुले, तरुणांना या गेमचं व्यसन जडलं आहे. राजस्थानमधील एका १५ वर्षीय शाळकरी मुलालाही पबजी सारख्या एका गेमचं वेड लागलं आहे. यामुळे १५ वर्षीय मुलगा झोपेतही फायर फायर ओरडतो, जणून गेमच खेळत आहे. सध्या एका दिव्यांग संस्थेच्या वसतिगृहात त्याचं समूपदेशन सुरू आहे. (Latest Marathi News)

देशभरात पबजी सारख्या फ्री फायर गेमचं तरुणांना वेड लागलं आहे. या गेमच्या व्यसनामुळे तरुण, शाळकरी मुलांवर मानसिक परिणाम होत आहे. राजस्थानातील १५ वर्षीय मुलावरही या गेमचा मानसिक परिणाम झाल्याचे समोर आले आहे.

Online Game
Jharkhand News : विद्यार्थिनी शाळेत टिकली लावून गेली, घरी आली आणि जीवनच संपवलं... काही तासात असं काय झालं?

राजस्थानातील १५ वर्षीय मुलगा गेल्या सहा महिन्यांपासून हा गेम खेळत होता. १५ वर्षीय मुलगा हा इयत्ता सातवीत आहे. सातत्याने गेम खेळण्यामुळे या मुलाच्या मानसिक आरोग्यावर परिणाम झाला आहे.

राजस्थानचा हा मुलगा सातत्याने फ्री फायर आणि बॅटल रॉयल गेम खेळायचा. त्यामुळे या गेमच्या व्यसनामुळे शाळकरी मुलाचं मानसिक आरोग्य ढासळल्याचं समोर आलं आहे. सध्या त्याचं समूदपशेन सुरू आहे.

मुलाच्या गेम खेळण्याच्या वेडामुळे कुटुंबाची चिंता वाढली आहे. त्याच्या कुटुंबाने त्याला अनेकदा गेम खेळण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, कुटुंबाने रोखले तरी त्याने गेम खेळणे सुरूच ठेवले होते. या गेमच्या व्यसनामुळे जेवणही सोडून दिलं आहे. तर झोपेतही अनेकदा 'फायर फायर' ओरडत असतो. तसेच झोपेतही त्याचे हात हलवित असतो. या मुलाची आई गृहीणी आहे तर वडील रिक्षा चालक आहेत.

Online Game
High Court News : आई व्हायचं की नाही हे ठरवण्याचा अधिकार 'त्या' महिलेचा, हायकोर्टाचं स्पष्ट मत

दरम्यान, या मुलाला राजस्थानच्या अलवरमधील एका वसतिगृहात ठेवण्यात आले आहे. तसेच समुपदेशक त्याच्यावर बारीक नजर ठेवत आहेत. तसेच त्याच्या सुधारणेवर लक्ष ठेवून आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com