Crime News: महाकुंभात महापाप! दुसरीसोबत सुत जुळलं, बायकोला महाकुंभात नेलं आणि चाकूने चिरला गळा

Husband kills wife over extramarital affair: विवाहबाह्य संबंधातून पतीनं पत्नीची हत्या केली आहे. आधी महाकुंभात संगम नदीवर स्नान करायला नेलं. नंतर तीची चाकूने हत्या केली.
mahakumbh 2025
mahakumbh Saam tv
Published On

महाकुंभ मेळ्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. विवाहबाह्य संबंधातून पतीनं पत्नीची हत्या केली आहे. आधी महाकुंभात संगम नदीवर स्नान करायला नेलं. नंतर तीची चाकूने हत्या केली. यानंतर कुटुंबाला आणि पोलिसांना सांगितलं की, पत्नी महाकुंभाच्या गर्दीत हरवली आहे. पोलिसांनी तपास केला असता, पतीनेच पत्नीची हत्या केली असल्याचं उघड झालं. या धक्कादायक घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

विवाहबाह्य संबंधातून पत्नीची हत्या

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी अशोक हा दिल्ली महानगरपालिकेत स्वच्छता कर्मचारी म्हणून कार्यरत आहे. तो दिल्लीतील त्रिलोकपुरीचा रहिवासी आहे. डीसीपी अभिषेक भारती यांनी सांगितले की, आरोपीचे विवाहबाह्य संबंध होते. आरोपी पती गेल्या ३ महिन्यांपासून त्याची पत्नी मीनाक्षीची हत्येचे कट रचत होता.

mahakumbh 2025
Viral News: ह्रदयद्रावक! कन्यादानानंतर बापाने सोडले प्राण, ह्रदयविकाराच्या झटक्यानं झालं निधन

हॉटेलमध्ये आढळला महिलेचा मृतदेह

अभिषेक भारती म्हणाले की, आरोपी आणि त्याची पत्नी १८ फेब्रुवारीला प्रयागराजला गेले होते. संगमात दोघांनी स्नान केलं, नंतर न्यु झुसी परिसरात एक खोली भाड्यानं घेतली. त्यानंतर दोघांमध्ये भांडण झालं. हाच राग मनात धरून त्यानं पत्नीची चाकूने गळा चिरून हत्या केली आणि पळ काढला. बाथरूममध्ये महिलेचा मृतदेह आढळल्यानंतर झुसी पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले.

mahakumbh 2025
Chhatrapati Shivaji Maharaj: छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायाचे ठसे कोणत्या किल्ल्यावर?

२१ फेब्रुवारीला मृत महिलेचा भाऊ आणि तिच्या मुलांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. कपडे आणि छायाचित्रांवरून महिलेची ओळख पटली. पोलिसांना कुटुंबातील सदस्यांकडून कळाले पतीचे विवाहबाह्य संबंध आहेत. पत्नीसोबत झालेल्या भांडणाचा राग मनात धरून त्याने पत्नीची हत्या केली असल्याचं कबुल केलं. या घटनेनंतर आरोपी पतीला अटक करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com