भारताचा शेजारचा देश हादरला; भूकंपाच्या धक्क्यामुळे सगळंच उद्ध्वस्त, ७ जणांचा मृत्यू, १०० हून अधिक ढिगाऱ्यात अडकले

Afghanistan Earthquake Kills 7: उत्तर अफगाणिस्तानमध्ये ६.३ रिश्टर स्केलचा जोरदार भूकंप झाला. मजार ए शरीफ शहराजवळ भूकंपाचे केंद्र. ७ जणांचा मृत्यू.
Afghanistan Earthquake Kills 7
Afghanistan Earthquake Kills 7Saam
Published On
Summary
  • उत्तर अफगाणिस्तानमध्ये भूकंप.

  • मजार ए शरीफ भूंकपाचे केंद्र.

  • भूकंपामुळे ७ जणांचा मृत्यू.

अफगाणिस्तानमधून मोठी बातमी समोर येत आहे. ऑगस्ट महिन्यानंतर आज पुन्हा एकदा अफगाणिस्तानला भूकंपाचा जोरदार धक्का बसला आहे. उत्तर अफगाणिस्तानमध्ये ६.३ रिश्टर स्केल भूंकपाचे हादरे बसले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेत किमान सात जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर, १०० हून अधिक लोक जखमी आहेत. त्यांना तातडीने रूग्णालयात उपचारासाठील हलवण्यात आलं आहे. भूकंपानंतर (USGS)ने त्यांच्या पेजर सिस्टमद्वारे या भागांत ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. या भूकंपामुळे मोठी जीवितहानी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

यूएसजीएसनुसार, भूंकपाचे मुख्य केंद्र उत्तर अफगाणिस्तानातील मजार ए शरीफ शहरापासून सुमारे २८ किलोमीटर अंतरावर होते. भूकंपाचे धक्के इतके तीव्र होते की, ते आजूबाजूच्या जिल्ह्यांमध्ये आणि शेजारील देशांमध्ये जाणवले. भूकंपाचे अनेक व्हिडिओ समाजमाध्यमांमध्ये व्हायरल झाले होते. या व्हिडिओत अफगाणिस्तानमधील भयावह परिस्थिती स्पष्टपणे दिसत आहे.

Afghanistan Earthquake Kills 7
ऑक्टोबर - नोव्हेंबरचा हप्ता एकत्र मिळणार? लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट समोर

कोसळेल्या इमारती, ढिगाऱ्यात अडकलेली लोक, मदतकार्यात गुंतलेले स्थानिक लोक यात दिसून येत आहे. स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितले की, ढिगाऱ्यात अडकलेल्यांना वाचवण्यासाठी बचाव पथके अथक परिश्रम घेत आहेत. अनेक भागांत संपर्क तुटला होता. मदत कार्यातही अडथळा निर्माण झाला होता, अशी माहिती त्यांनी दिली.

Afghanistan Earthquake Kills 7
महिला विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यापूर्वी भयंकर घडलं; माजी क्रिकेटपटूचा अपघाती मृत्यू

यापूर्वी २३ सप्टेंबर रोजी दक्षिण पूर्व अफगाणिस्तानमध्ये ४.९ तीव्र रिश्टर स्केल भूकंप आला होता. तर, ३१ ऑगस्टमध्येही देशाच्या पूर्व भागातील काही ठिकाणी भूकंपाचे हादरे जाणवले होते. ज्यामध्ये २,२००हून अधिक लोक मृत्यूमुखी पडले होते. वारंवार येणाऱ्या भूकंपाच्या धक्क्यांमुळे अफगाणिस्तानमधील काही भाग हादरला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com