

आजचा दिवस भारतीय क्रिकेटसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण भारतीय महिला संघ, पहिल्या विश्वचषक विजेतेपदासाठी अंतिम फेरीत दक्षिण अफ्रिकेच्या संघाविरूद्ध लढण्यासाठी मैदानात उतरणार आहे. सेमीफायनलमध्ये घवघवीत यश मिळवल्यानंतर भारतीय महिला संघ आता फायनल खेळासाठी मैदानात उतरली आहे. अशातच या आनंददायी क्षणी क्रिकेटविश्वातून एक दुख:द बातमी समोर येत आहे. भारताचा माजी क्रिकेटपटू राजेश बानिक यांचा रस्ता अपघातात मृत्यू झाला आहे.
पश्चिम त्रिपुरातील आनंदनगर येथे ४० वर्षीय बानिक यांचे अपघाती निधन झाले. त्यांच्या निधनाच्या वृत्तानंतर संपूर्ण क्रिकेट जगतात शोककळा पसरली आहे. राजेश इरफान पठाण आणि अंबाती रायुडूसारख्या खेळाडूंसोबत त्यांनी सामना खेळला आहे. तसेच बानिक त्रिपुराकडून रणजी ट्रॉफी स्पर्धेतही खेळले होते. २०१८ साली त्यांनी आपला शेवटचा सामना खेळला होता. त्रिपुरा क्रिकेट असोसिएशनचे सचिव सुब्रत डे यांनी बानिक यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेश बानिक हे रस्ता अपघातात गंभीर जखमी झाले होते. बानिक यांना आगरतळा येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान राजेश यांचा मृत्यू झाला.
सुब्रत डे यांनी शोक व्यक्त करत सांगितले की, 'आज एका उत्तम क्रिकेटपटू आणि अंडर १६ क्रिकेट टीम सिलेक्टर राजेश बानिक यांचं निधन झालं आहे. ही अत्यंत दुःखद बातमी आहे. ते केवळ उत्तम अष्टपैलू खेळाडू नव्हते, तर, बानिक यांच्यात क्रिकेट खेळण्यासाठी हुरूप होता. त्यांना युवकातील टॅलेंटची उत्तम जाण होती. म्हणूनच त्यांना राज्याच्या अंडर-१६ संघाचा सिलेक्टर म्हणून नियुक्त करण्यात आले होते'. राजेश बानिक यांच्या निधनामुळे भारतीय क्रिकेट जगतात हळहळ व्यक्त होत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.